महाराष्ट्र

Heavy Rain in Baramati: बारामती तुंबली! 3 इमारतींना तडे, नागरीक भयभीत

Baramati Rainfall : अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहा:कार माजवलाय. बारामती तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने ४० वर्षांचा रेकॉर्ड मोडला.

Bharat Jadhav

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातलाय. कोकणताल आणि पुण्यातील काही तालुक्यांमध्ये पावासने थैमान घातले आहे. पुण्याच्या बारामती तालुक्यात तर मान्सून पूर्व पावसाने 40 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय. ओढे, नाले आणि तलावांना नद्यांचं स्वरुप प्राप्त झालंय. बारामती आणि दौंड तालुक्यांना पावसाने झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे बारामती तालुक्यातील 3 इमारतींना तडे गेले आहेत. या घटनेनंतर इमारती नागरिकांनी तातडीने जवळील पोलीस ठाण्यात धाव घेतलीय.

बारामतीमधील एमआयडीसी पेन्सिल चौका शेजारील ३ बिल्डिंग पावसाने खचल्या आहेत. साईरंग, ऋषिकेश आणि श्री समर्थ अशी बिल्डिंगची नावे आहेत. तिन्ही बिल्डिंगमधील रहिवाशांनी पोलीस स्टेशनला धाव घेतलीय. सर्व फ्लॅट रिकामे करण्यात आली आहेत. फ्लॅटमधील सर्व नागरिक रस्त्यावर आलेत. प्रशासनाकडून या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरु असल्याची शक्यता आहे.

बारामतीमधील पावसाच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत नागरिकांना आवाहन केलंय. बारामती लोकसभा मतदारसंघासह पुणे जिल्ह्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. तीन चार दिवसांपासून संततधार आहे, यामुळे अनेक ठिकाणी ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT