Rain in Maharashtra Saam tv
महाराष्ट्र

Rain in Maharashtra : ढगफुटीसदृश्य पाऊस, घरांमध्ये पाणी शिरलं, रस्ते वाहून गेले; महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणाऱ्या पहिल्या पावसाचे VIDEO

Maharashtra rain Update : राज्यभरातील विविध जिल्ह्यात पहिल्याच पावसाने मोठा कहर केलाय. अचानक आलेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने शेकऱ्यांचे मोठे नुसकान झाले आहे. काही ठिकाणी रस्ते वाहून गेल्याचीही घटना घडली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : राज्यभरातील विविध जिल्ह्यात पहिल्याच पावसाने कहर केला आहे. पहिल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. पहिल्या पावसाने शेतकऱ्यांच्या बागा उद्ध्वस्त केल्या आहेत. तर अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय. या पावसामुळे लातूरमध्ये एक रस्ताही वाहून गेला आहे. पहिल्याच पावसाने पिकांचे मोठे नुकान झाल्याने शेतकरीराजा हवालदिल झाला आहे.

पहिल्या पावसाचा कहर सोलापूर, लातूर , अहमदनगर, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पाहायला मिळाला. मुसळधार पावसाचा बागायतदार शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोहोळ तालुक्यातील टरबूज, डाळिंब आणि केळी बागांचं नुकसान झालंय.

अहमदनगरमध्येही संततधार पाऊस

अहमदनगरमध्येही संततधार पाऊस सुरु आहे. नगरमध्ये सकाळपासूनच पाऊस सुरु आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. संततधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. या पहिल्या पावसाने शाळकरी मुलांचेही हाल झाले.

पर्यायी रस्ताच गेला वाहून

लातूर-उदगीर महामार्गावरील नळेगाव येथील पुलाशेजारील पर्यायी रस्ता वाहून गेला आहे. यामुळे लातूर-उदगीर वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तर पहिल्याच पावसात जिल्ह्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे.

खामगावात ढगफुटीसदृश्य पाऊस

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झालं. या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं. तसेच दुकानातही पाणी शिरलं. खामगावात बोर्डी नदीलाही पूर आला होता. त्यामुळे परिसरात पाणीच पाणी दिसून आलं. अचानक आलेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने खामगावात शहरात प्रचंड नुकसान झालं आहे.

शेतकऱ्यांची शासनाकडे मोठी मागणी

नांदेड जिल्ह्यात मे महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पावसाने झोडपलं. या पावसाने जिल्ह्यातील फळबागांचे मोठं नुकसान झालं आहे. 23 शेतकऱ्यांचे 745 हेक्टरवरील बागांचे नुकसान झालं आहे. या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. २ कोटी ३९ लाख ९ हजार ४०० रुपये निधीची मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drinking water: तुम्हीही उभं राहून पाणी पिता? आजच बदल ही सवय; ४ आरोग्य समस्या उद्भवू शकतात

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन जाहीर सभा

Nagpur Politics: नागपूरमध्ये भाजपकडून मोठी कारवाई, ३२ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, बॅगचे स्कॅन अन् स्टिकर लावूनच करता येणार प्रवास; नाहीतर...

Union Budget 2026: यंदा देशाचा अर्थसंकल्प कधी सादर होणार? वाचा तारीख आणि वेळ

SCROLL FOR NEXT