heatstroke to chickens nandurbar poultry traders loss Saam Digital
महाराष्ट्र

Nandurbar: उष्माघाताने हजाराे कोंबड्यांचा मृत्यू, नंदुरबारचे पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

नंदुरबार जिल्ह्यात उष्माघाताने सुमारे चार हजार कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोंबड्यांच्या होत असलेल्या मृत्यूमुळे नंदुरबार जिल्ह्यात कुकूटपालन क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. काेंबड्यांच्या मृत्यूमुळे कुकूटपालन व्यवसाय करणा-यांचे माेठे आर्थिक नुकसान झाले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. त्याचा परिणाम मानवी जीवनासह प्राणी आणि पक्ष्यांवर देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.

तळोदा तालुक्यातील बोरद आणि लाखापूर फॉरेस्ट येथील पोल्ट्री फार्मवर 4 हजार कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची दखल घेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बोरद आणि लाखापूर येथे धाव घेतली.

कोंबड्यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत कोंबड्यांपैकी काही कोंबड्यांचे शवविच्छेदनात उष्णतेमुळे कोंबड्यांना श्वास घेणे कठीण झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT