Weather Update Today saam tv
महाराष्ट्र

Heat Wave In Maharashtra : नागरिकांनो काळजी घ्या! मुंबईसह कोकणातील ४ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

Weather Update Today: सध्या मुंबईकरांना उष्णतेचा तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. मुंबईत बुधवारी ३८. ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Chandrakant Jagtap

>> रुपाली बडवे

IMD Weather Forecast Today: राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातलं असताना आता दुसरीकडे उष्णतेच्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याने (IMD) पुढील ४ दिवस मुंबईसह आसपासच्या काही जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाटेचा (Heat Wave) इशारा दिला आहे. मुंबईसह कोकणातील ४ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या मुंबईकरांना उष्णतेचा तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. मुंबईत बुधवारी ३८. ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यानंतर आता पुढील चार दिवस मुंबईकरांना आणखी काळजी घ्यावी लागणार आहे. कारण मुंबईसह कोकण आणि गोवा भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. २० तारखेपासून ४ दिवसांसाठी Tmax मध्ये २-४° ने घसरण होणार आहे.

शनिवारपर्यंत मुंबईतील उष्णतेची लाट

शनिवारपर्यंत मुंबईतील उष्णतेचा पार चढताच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील किमान ४ दिवस मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यातील लोकांनी उन्हात घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

विदर्भात गारपिटीचा अंदाज

याशिवाय पुढील ५ दिवसांत विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगढमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये २० तारखेला गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागातून व्यक्त करण्यात आली आहे. (Maharashtra Weather Forecast)

आठ राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने आंध्र प्रदेशसह आठ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. उन्हामुळे अनेक राज्यांत परीक्षांच्या काळातही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर काही राज्यांत शाळांच्या वेळा बदलून विद्यार्थ्यांना ऊन वाढण्यापूर्वी घरी पाठवले जात आहे.

पुढील दोन दिवस कमाल तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे. आंध्र प्रदेशसह उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, सिक्कीम, ओडीशासह आठ राज्यांत उष्णतेच्या लाटेमुळे दक्षतेचा इशारा देण्यात आला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

SCROLL FOR NEXT