Newly Married Sister and Bride-to-Be Killed in Horrific Road Accident Saam TV Marathi
महाराष्ट्र

Accident : स्वप्नांचा चुराडा! हळदी कुंकवाला जाताना २ बहिणींचा मृत्यू, पुढच्या महिन्यातच होतं लग्न, पण त्याआधीच...

Newly married woman killed in Nagpur road crash : नागपूर–भंडारा महामार्गावर नाग नदीच्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात दोन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जात असताना भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

Namdeo Kumbhar

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Two sisters died in Nagpur Bhandara highway accident : हळदी कुंकवाचा कार्यक्रमाला जाताना २ बहि‍णींचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाग नदीवर झालेल्या भयंकर अपघातात दोघांचीही जागेवरच म-त्यू झाला. नागपूर–भंडारा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. अलिशा आणि मोनाली अशी अपघातात मृत्यू झालेल्या बहि‍णींची नावे आहेत. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जाताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. या अपघातानंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला केली अन् वाहतूक सुरळीत केली. आलिशाचा ७ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता, तर मोनालीचा २६ फेब्रुवारी रोजी विवाह होणार होता. पण त्याआधीच स्वप्नाचा चुराडा झाला. (Newly Married Sister and Bride-to-Be Killed in Horrific Road Accident)

नागपूर भंडारा महामार्गावर महालगावजवळ नाग नदीच्या पुलावर भरधाव वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने भयंकर अपघात झाला. अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे अशी मृत बहि‍णींची नावे आहेत. अलिशा आणि मोनाली या मामे–आते बहिणी असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. अपघात झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद करत पोलिसांनी पुढील कारवाई केली. पोलिसांनी मृतदेह सरकारी रूग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

अलिशा आणि मोनाली या बहिणी भुगाव येथे हळदी–कुंकवाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जात होत्या. त्यावेळी नाग नदीच्या पूलावर त्यांच्या दुचाकीला जोरात धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की दोघीही गंभीर जखमी झाल्या. अलिशा मेहर यांचा जागीच मृत्यू झाला. मोनाली घाटोळे यांना उपचारासाठी नागपूरला नेत असताना वाटेत मृत्यू झाला. दोघींच्या मृत्यूने नागपूरवर शोककळा पसरली आहे.

अलिशा या पिपळा डाक बंगला येथील रहिवासी होत्या. अलिशाचा सात महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तर मोनालीचा विवाह येत्या २६ फेब्रुवारीला निश्चित झाला होता. लग्नाची खरेदी आणि तयारी सुरू असतानाच काळाने घाव घातला. दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून संबंधित प्रकरणी पोलिसांनी नोंद घेत तपास सुरू केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एसटी डेपोत 'मद्यधुंद' कारभार; रेस्ट रूममध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या, मंत्री प्रताप सरनाईक संतापले अन्...

Maharashtra Live News Update: संजय राऊत यांना महाराष्ट्राची संस्कृती आणि प्रोटोकॉल माहीत नाही संजय शिरसाट

Maharashtra Politics: 'तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा', शिंदेंच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान

Shocking : धक्कादायक! पिझ्झा शॉपमध्ये डेटला गेले, जातीवरून हिणवलं; प्रेमी युगुलांनी थेट दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी

Phone Battery Care: बॅटरी किती टक्के झाल्यावर चार्जिंगवरुन फोन काढायचा?

SCROLL FOR NEXT