Ahmednagar News  गोविंद साळुंके
महाराष्ट्र

हृदयद्रावक! कडबा कुट्टी मशीनमध्ये अडकून महिलेचा मृत्यू

नेवासा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

गोविंद साळुंके

अहमदनगर: नेवासा तालुक्यातील देवगाव (Devgaon) येथे हृदय हेलावून टाकणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. जनावरांसाठी कडबाकुट्टी करत असताना महिलेच्या साडीचा पदर कडबा कुट्टी यत्राच्या बेल्टमध्ये अडकल्याने झालेल्या अपघातात (accident) महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. सरिता अजिनाथ गवते (वय- २५) असे दुर्दैवी मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.

हे देखील पाहा-

मिळालेल्या माहितीनुसार, पती आजिनाथ व सरिता हे दोघे सकाळी ७ वाजेच्या सुमारास जनावरांसाठी कडबा कुट्टी करत असताना नजर चुकीने सरिताच्या साडीचा पदर कडबा कुट्टी यंत्राच्या बेल्टमध्ये अडकला गेला होता. सरिता हिचे डोके मशीनवर मागील बाजूने जोरदार आदळले. डोक्याला मोठी जखम झाली व मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरु झाला. या घटनेनंतर तात्काळ महिलेला नगर (Ahmednagar) येथील रुग्णालयात (hospital) नेत असताना रुग्णालयाजवळ जात असतांनाच रस्त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या घटनेने देवगाव परिसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केला जात आहे. महिलेला ३ वर्षाचा मुलगा तसेच ११ महिन्याची लहान मुलगी आहे. या लहानग्या कोवळ्या मनांना आपल्या आईच्या घटनेविषयी कुठलीही समज नसल्यामुळे केवळ अंत्यविधीसाठी आलेल्या गर्दीकडे बघून रडत मम्मी मम्मी म्हणत असताना अनेकांचे मन हेलावून गेले आहे. देवगाव येथे शोकाकुल वातावरणात सरितावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT