धक्कादायक! आरोग्य केंद्रातील अधिकारी कुलूप लावून गायब संजय जाधव
महाराष्ट्र

धक्कादायक! आरोग्य केंद्रातील अधिकारी कुलूप लावून गायब

आरोग्य केंद्रातील दांडीबहाद्दर कर्मचार्‍यांवर कारवाई होणार का...?

संजय जाधव

बुलढाणा: कार्यालयीन वेळेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि इतर कर्मचारी हे सर्वजण दाराला कुलूप लावून गायब असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेगाव तालुक्यातील जलंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील कार्यरत डॉक्टर व इतर कर्मचारी नेहमीच गैरहजर राहत असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी केल्या जात होत्या, तर आज या रुग्णालयात काही रुग्ण उपचारासाठी गेले असता, रुग्णालयात एकही डॉक्टर किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.

कोरोनाचे सावट कमी झाले असले तरी देखील कोरोना पूर्णपणे हद्दपार झालेला नाही, आणि आता संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल फ्लू सह इतर आजाराने नागरिक ग्रस्त असून, सर्वच शासकीय व खाजगी रुग्णालय गच्च भरलेले दिसत आहेत.

मात्र दुसरीकडे जलंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य विभागाची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत, त्यामुळे रुग्णांची गैरसोय करणाऱ्या या सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT