Maharashtra bribery case saam tv
महाराष्ट्र

Maharashtra bribery case: मुख्याध्यापकच निघाला लाचखोर! शिक्षिकेकडं मागितले ५० हजार, ACB च्या जाळ्यात अडकला

Maharashtra bribery case: संगमनेर तालुक्यातील घारगावच्या भारत हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय राणे यांना महिला शिक्षिकेकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक ACB ने पकडल्याची माहिती आहे. एक स्तर वेतनश्रेणीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली होती.

Surabhi Jayashree Jagdish

शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना संगमनेर तालुक्यातील घारगावमधून समोर आलीये. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत चांगले संस्कार आणि नीतिमत्तेचे धडे देणाऱ्या मुख्याध्यापकाने चक्क आपल्याच शाळेतील महिला शिक्षिकेकडे लाचेची मागणी केली. या प्रकरणी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक संजय यांना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे.

महिला शिक्षकाने केली तक्रार

मिळालेल्या माहितीनुसार, घारगावमधील या हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात ही घटना घडली. एका महिला शिक्षिकेचा एक स्तर वेतनश्रेणीचा प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी मुख्याध्यापक संजय यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत संबंधित महिला शिक्षिकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

ACB ने रचला सापळा

या तक्रारीची दखल घेत नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शाळेच्या परिसरातच सापळा रचला. ठरल्याप्रमाणे महिला शिक्षिकेकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने मुख्याध्यापक संजय राणे यांना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

या घटनेमुळे घारगाव परिसरात मोठी खळबळ उडालीये . महत्त्वाचं म्हणजे ज्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा आणि चांगल्या वागणुकीचे धडे दिले जातात त्याच शाळेच्या मुख्याध्यापकावर लाच मागितल्याचा आरोप समोर आलाय. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातही या घटनेची चर्चा सुरू झाली असून, शिक्षण संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवारांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे नेते सिल्वर ओकवर; 3 तासांपासून बैठक

टेक महिंद्राच्या आशिया विभागाच्या माजी प्रमुखावर १४ राऊंड फायरिंग; ९ गोळ्या शरीराच्या आरपार

Amitabh Bachchan : बिग बी अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली; 'कौन बनेगा करोडपती'चे शूटिंग बंद

Heart Health : आरोग्याच्या दृष्टीने महिन्याला किती तेल वापरणे योग्य? जाणून घ्या

Diwali gifts for employees: मालक असावा तर असा! कर्मचाऱ्यांना दिलं १ लाख रुपयांचा दिवाळी बोनस

SCROLL FOR NEXT