navratri festival 2023, dharashiv news saam tv
महाराष्ट्र

Navratri Festival 2023 : 'कलायाेगी'ने साकारली 18 फूटी हातलाई देवीची रांगाेळी, धाराशिवला भाविकांची मांदियाळी

रांगोळीचे काम पूर्ण करण्यासाठी सलग सात तासांचा कालावधी लागला आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv News : नवरात्र महोत्सवानिमित्त धाराशिव येथील हातलाई देवी मंदिराच्या गाभाऱ्यात 270 चौरस फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. कलायोगी आर्ट्सच्या वतीने ही रांगोळी साकारण्यात आली आहे. (Maharashtra News)

या रांगोळीचा आकार 15 फुट रुंद 18 फूट उंच इतका आहे. या रांगोळीसाठी 50 किलो रंगीत रांगोळीचा वापर करण्यात आला. रांगोळीचे काम पूर्ण करण्यासाठी सलग सात तासांचा कालावधी लागला आहे.

ही रांगोळी कलायोगी आर्ट्सचे संचालक राजकुमार कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी साकारली असून भली माेठी सुंदर रांगोळी पाहून भाविक कलाकारांचे काैतुक करीत आहेत.

भाविकाकडून श्री विठ्ठल मंदिरास 26 तोळ्यांचे साेने अर्पण

धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी येथील एका वृद्ध महिलेने विठ्ठल चरणी तब्बल 18 लाख रुपये किमतीचे दागिने दान केलेत. बाई वाघे असं या महिलेचे नाव आहे. त्या पत्र्याच्या घरात राहतात.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात विठ्ठलाला सोन्याचा कडदोरा व रुक्मिणीला गंठण असे लाखो रुपयांचे दागिने त्यांनी नुकतेच अर्पण केले. याबद्दल देवस्थान समितीने त्यांचा सत्कार केला. यासोबतच त्यांनी आतापर्यंत विविध मंदिरात जवळपास 50 लाखांचे दान केले आहे. यासाठी त्यांनी आपली सहा एकर जमीन विकल्याचे सांगितले जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Shukra Gochar 2026: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Best Sleeping Time: वयानुसार तुम्ही किती तास झोपले पाहिजे? जाणून घ्या

Parth Pawar: कुणी चुकीचे काम करत असेल तर...; पार्थ पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Janhvi Kapoor: वेडिंग सीझनसाठी परफेक्ट आहे जान्हवीचा 'हा' लूक तुम्हीही करु शकता रिक्रिएट

SCROLL FOR NEXT