Hasan Mushrif News saam tv
महाराष्ट्र

Hasan Mushrif News: तुरुंगात कसं टाकायचं मला माहितीये; हसन मुश्रीफांचा इशारा कुणाला? वाचा

Vishal Gangurde

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यासहित कोल्हापुरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. कोल्हापुरात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्याोप सुरु आहेत. राज्य सरकारकडूनही विविध योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. याचदरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरकारी डॉक्टरांना मोठा इशारा दिला आहे. 'डॉक्टरांनी मोफत उपचार केले नाही तर त्यांना तुरुंगात कसं टाकायचं मला माहितीये, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी इशारा दिला.

मंत्री हसन मुश्रीफ यांचा इचलकरंजी मेळावा सुरु आहे. इचलकरंजी मेळाव्यात हसन मुश्रीफांना उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. या मेळाव्यात मंत्री मुश्रीफ यांनी सरकारी डॉक्टरांनी चांगलाच इशारा दिला. 'माझ्याकडं जे खातं आलं, मी त्या खात्याचा उपयोग जनतेसाठी केला. गरीब नागरिकांच्या गंभीर आजारांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांनी मोफत उपचार केले नाही तर तुरुंगात कसं टाकायचं मला माहितीये, त्यामुळं डॉक्टर माझं निमुटपणे ऐकतात. महाराष्ट्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षेचा कायदा केला आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व योजना घेतल्या आहे.

आगामी विधानसभेवरही मुश्रीफ यांनी भाष्य केलं आहे. 'विधानसभा निवडणूक दोन विचारांची आहे. मी एका बाजूला गोरगरीबांची दिवसरात्र कामं करतो. दुसऱ्या बाजूला विरोधकांना तुरुंगात घालून काम करणारी वृत्ती तालुक्यात आहे. या प्रवृत्तीनं मला शरद पवारांना सोडण्याची वेळ आणली. त्या प्रवृत्तीला ठेचलेच पाहिजे. मी शरद पवार यांना गुरुदक्षिणा दिली, पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला. पहिल्या चार वर्षात देवेंद्र फडणवीसांकडून काम करून घेतलं. माझ्यावर दबाव आणून चार हजार लोकांच्या पेन्शन बंद करायला लावल्या'.

'त्यांनी गोरगरिबांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम केलं. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक नेहमी म्हणायचे की, सरंजामशाहीला सत्ता कशाला पाहिजे? त्यांना त्यांची संपत्ती सांभाळायची आहे. गेल्या तेरा वेळा जे झालं नाही, ते आता कसं होईल, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही सगळे गावागावात काम करा, एक लाख मतापेक्षा जास्त मताधिक्याने मी निवडून येणार आहे, असं म्हणत मुश्रीफांनी विरोधकांनाही इशारा दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: लोकसभेत फटका, विधानसभेत सावध पवित्रा! भाजपने विधानसभेसाठी काय केली आहे मायक्रो प्लॅनिंग? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates : भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटलांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

Curry Leaves: रिकाम्या पोटी कढीपत्त्याची पानं खाण्याचे आरोग्यदायी फायदे...

Health Tips: पोट साफ होण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा...

Popular Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, दोन वेळा जिंकला होता ऑस्कर अवॉर्ड

SCROLL FOR NEXT