Hasan Mushrif, Raju Shetti saam tv
महाराष्ट्र

FRP For Sugarcane : साखर कारखानदारांना दर द्यायला लावू पण... राजू शेट्टींना समजावून सांगू असं का म्हणाले हसन मुश्रीफ

यंदाचा तोडणी हंगाम हा एक नोव्हेंबर पासून सुरू होईल अशी आशा आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : राजू शेट्टी यांनी सीएची टीम पाठवावी, ज्या कारखान्याचे पैसे सरपल्स असतील त्यांना (3620 रुपयांपेक्षा जादा) दर द्यायला लावू असे काेल्हापूर पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी साखरेच्या दरावरुन चाललेल्या आंदाेलनाबाबत टिप्पणी केली. दरम्यान कारखाने कर्जात असतील तर आम्ही काय करावं याचा सल्ला देखील राजू शेट्टी (raju shetti) यांनी द्यावा असेही मुश्रीफ यांनी नमूद केले. (Maharashtra News)

राजू शेट्टी यांच्यासोबत कारखानदार आणि जिल्हाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत कारखानादारांच्या प्रतिनिधींनी स्वाभिमानीच्या मागणीनूसारचा दर देण्यास असर्मथता दाखविली. त्यानंतर शेट्टींनी आंदाेलन तीव्र करणार असल्याचे म्हटले.

दरम्यान याबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले मी देखील राजू शेट्टी यांची भेट घेऊन समजावून सांगेन. साखर कारखान्यांनी 100 टक्के एफआरपी दिली आहे. वाढीव नफ्यात जे येईल ते कारखाने देतील मात्र यावर अजून बैठक झाली नाही. दोन महिन्यात साखरचे दर वाढले आहेत, पण याआधी कारखाने कर्जात आहेत.

एका कार्यक्रमात मी राजू शेट्टी यांना विनंती केली की 3620 रुपयांपेक्षा जात नाही. राजू शेट्टी यांनी सीएची टीम पाठवावी ज्या कारखान्याचे पैसे सरपल्स असतील त्यांना हा दर द्यायला लावू पण कारखाने कर्जात असतील तर आम्ही काय करावं याचा सल्ला देखील राजू शेट्टी यांनी द्यावा.

कर्नाटक राज्यातील साखर कारखान्याचे दर तोडणी आणि वाहतूक मिळून असतो ते वजा करून पैसे देतात. यंदाचा तोडणी हंगाम हा एक नोव्हेंबर पासून सुरू होईल अशी आशा आहे. बुधवारी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक होणार आहे त्यात निर्णय होईल असेही मुश्रीफ यांनी नमूद केले.

यावेळी सर्वात कमी साखरेचा सिजन होणार आहे असे सांगत राजू शेट्टी यांची भेट घेईन आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील असेही मुश्रीफांनी (hasan mushrif latest marathi news) स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Emraan Hashmi : सई ताम्हणकरनंतर 'ही' मराठमोळी अभिनेत्री इमरान हाश्मीसोबत झळकणार, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Maharashtra Weather: महाराष्ट्रात थंडीची लाट कायम, हुडहुडी भरली अन् शेकोट्या पेटल्या; आज कुठे कसं हवामान?

Expressway Accident : हायवेवर पहाटे काळाचा घाला, ७ बसे अन् ३ कार जळून खाक, ७ जणांचा जळून मृत्यू, २५ गंभीर जखमी

Ladli Behna Yojana: लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवणार! १५०० नाही तर ₹३००० मिळणार; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT