Indapur Assembly Election 2024: Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: इंदापूरची जागा भाजपकडे? अजित पवार- फडणवीसांमध्ये काय ठरलं? हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं; दत्ता भरणेंचं टेन्शन वाढलं!

Indapur Assembly Election 2024: लोकसभेपूर्वी अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या चर्चेचा तपशीलही त्यांनी सांगितला. इंदापूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

Gangappa Pujari

सचिन जाधव, ता. १८ ऑगस्ट २०२४

इंदापूर विधानसभेचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो मला मान्य असेल व त्याला पाठिंबा असेल, असे अजित पवार यांनी कबूल केल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी ही जागा आपल्याकडेच असल्याचा दावा केला आहे. लोकसभेपूर्वी अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या चर्चेचा तपशीलही त्यांनी सांगितला. इंदापूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले हर्षवर्धन पाटील?

"लोकसभेच्या निवडणुकीवेळी आमचे नेते देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि माझ्यात चर्चा झाली होती. राजकारणामध्ये बंद दाराआड झालेल्या चर्चा सांगायच्या नसतात. मात्र त्या चर्चेमध्ये अजित पवार यांनी इंदापूर विधानसभेचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो मला मान्य असेल व त्याला माझा पाठिंबा असेल," असे कबुल केल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

तसेच "त्यानंतर झालेल्या प्रचार सभांमध्येही भाषणांत अजितदादांनी हेच म्हटलं होतं. त्यासह फडणवीसांनी इंदापूर आणि मुंबईत तेच सांगितलं होतं. इंदापूरची जागा कोणत्या पक्षाला जाते, यावर अजून बरीच चर्चा बाकी आहे. जे ठरलं होतं, त्यानुसार आमचे नेते निर्णय घेतील," असं म्हणत एकप्रकारे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरची जागा भाजपला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीची परिस्थिती वेगळी होती आता तीन महिन्यात विधानसभेचे गणित बदलले. कोणत्याही निवडणूकीत जनता काय करायचं हे ठरवते. आम्ही शक्तीस्थळ असल्यानेच टार्गेट केले जाते. कदाचित काहींना आमची भिती वाटत असेल, आम्ही शक्तीस्थळ असल्यामुळेच हल्ले होतात, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fire : पुण्यात भीषण दुर्घटना! १४ मजली इमारतीत आग, सिलेंडरचा स्फोट, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ५ जखमी

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT