Harishchandragad witnessed a frightening landslide incident as trekkers were caught in falling debris saam tv
महाराष्ट्र

हरिश्चंद्रगडावर भीषण दुर्घटना! दरड कोसळली, मुंबईचे २ ट्रेकर्स मातीखाली गाडले गेले

Harishchandragad Fort Landslide: हरिश्चंद्रगडावरून खाली उतरत असलेल्या ट्रेकर्सवर दरड कोसळली. या घटनेत मुंबईच्या मालाड भागातील चार पर्यटक जखमी झालेत.

Bharat Jadhav

  • हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगदरम्यान दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली.

  • मुंबईतील मालाड परिसरातील चार ट्रेकर्स जखमी.

  • घटना भंडारदरा परिसरातील लोकप्रिय पर्यटनस्थळ

पावसाळ्यात अनेक पर्यटक पावसाळी सहलीला जात असतात. गड किल्ले आणि धबधबे हे मुख्य आकर्षण असतात. पर्यटकांचं असेच एक आवडतं ठिकण म्हणजे भंडारदरा परिसरातील ऐतिहासिक हरिश्चंद्रगड. रविवारच्या सुट्टीमुळे या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली असताना ही दुर्घटना घडली. येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. परंतु या ठिकाणी एक दुर्घटना घडलीय. ट्रेकर्स गडावरून खाली उतरत असताना अचानक दरड कोसळल्याने मुंबईतील मालाड येथील चार पर्यटक गंभीर जखमी झालेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मालाडमधील १० पर्यटकांचा एक ग्रुप हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी गेला होता. रविवारी दिवसभर पाऊस सुरू होता. त्यावेळी हा ग्रुप गडावरून खाली उतरत होता. गडावरील आडव्या कठड्याच्या मागील बाजूला पोहोचले असताना दरड कोसळली. माती आणि दगडांचा ढिगारा अंगावर आल्याने दोन पर्यटक थेट मातीखाली गाडले गेले. तर इतर दोन जणांना दगडांचा मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

दरड कोसळली तेव्हा सुदैवाने तेथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बांधलेले लोखंडी रेलिंग होते. या रेलिंगमुळे पर्यटकांना आधार मिळाला. त्यामुळे ते खोल दरीत कोसळण्यापासून वाचले. अपघात घडताच सोबतच्या इतर पर्यटकांनी एका स्थानिक ग्रामस्थांना माहिती देत पायथ्याखालील गावाला आणि वन्यजीव विभागाला घटनेची माहिती दिली.

रुग्णालयात उपचार सुरू

माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने गडावर धाव घेतली. गावकऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांना उचलून गडाच्या पायथ्याशी आणले. जखमी पर्यटकांना तातडीने राजूर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना तत्काळ नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कळंबोली पुलावर लोखंडी होर्डिंग कोसळून अपघात; प्रशासनाकडून तातडीने रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू

Patra Recipe : पावसाळ्यात भजी-समोसा विसरा! नाश्त्याला बनवा चटपटीत 'पात्रा', एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

Hair loss: केस गळतीने हैराण? दररोज खा ६ पदार्थ खा, काही दिवसांतच दिसेल फरक!

Beed : बीड हादरले! परळीत आढळला माणसाचा तुटलेला पाय; परिसरात प्रचंड खळबळ

Gold Rate Today : सोनं खरेदीदारांसाठी मोठी बातमी! सोन्याचे दर पुन्हा बदलले; २४, २२ आणि १८ कॅरेटचा आजचा भाव काय?

SCROLL FOR NEXT