Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed Bus Stop News: बसस्थानकाच्या कँटीनमध्ये गुंडागर्दी; वेटरकडून अपंग ग्राहकाला मारहाण...

Handicapped customer assaulted by waiter: गुंडागर्दी अन् मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

विनोद जिरे

Beed Latest News : बीड बसस्थानकाच्या कँटीनमध्ये गुंडागर्दी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ग्रामीण भागातून आलेल्या अपंग व्यक्तीला जेवणाचे पैसे देण्यासाठी नसल्याने, वेटरने ग्राहकाला मारहाण केलीय. यावेळी त्या ग्राहकाला बेंचवर आणि भिंतीवर देखील पाडण्यात आलं. विशेष म्हणजे जेवलेल्या बिलावरून हातात दांडा घेत दहशत निर्माण करून वसुली करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि याचं गुंडागर्दी अन मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. (Latest Marathi News)

बीड (Beed) बसस्थानकातील कँटीनमध्ये ग्रामीण भागातून आलेला, अपंग व्यक्तीने चपाती भाजी खाल्ली. मात्र माझ्याकडे बिल देण्यासाठी पैसे नाहीत. असं म्हणून त्या ग्राहकाने वेटरला हात जोडून विनंती केली. यावर वेटरने त्या ग्राहकाच्या कानशिलात लगावली. एवढ्यावरचं हे थांबले नाही तर त्याला धरून ओढत आणत बेंचवर पाडले. त्यानंतर त्याच्या खिशाची तपासणी करून खिशातील पैसे काढले अन काऊंटरकडे ओढत नेत भिंतीवर देखील पाडलं. ही घटना साधारण 4 दिवसापूर्वीची असून घडलेला या सर्व घटनेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालाय.

दरम्यान सदरील ग्राहक हा अपंग आहे. पैसे नाही म्हणत असतांना त्याला मारहाण करून पैसे घेतले, त्यानंतर परत त्याला भिंतीवर पाडलं. त्यामुळं एका अपंग व्यक्तीचे 2 चपाती आणि भाजीचे पैसे न देण्याचे कारण काय होते ? हे माहीत नसले तरी या बसस्थानकाच्या कँटीनमधील घटनेने संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळं या कँटीनमध्ये प्रवाशांना व्यवस्थित सेवा दिली जातेय का ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून त्या मारहाण करणाऱ्या वेटर अन मालकावर कारवाई करावी. अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

The Traitors Winner: उर्फी जावेद आणि निकिता लूथर ठरले 'द ट्रेटर्स'चे विजेते; ट्रॉफीसह मिळाणार कोट्यावधींचे बक्षीस

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Accident: नामकरण सोहळ्यावरून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT