saam tv
महाराष्ट्र

गुटखा माफियांचा अन्न व औषध विभागाच्या पथकावर जीवघेणा हल्ला; अधिकाऱ्याच्या अंगावर कार घातली

Gutkha Smugglers Attack FDA Squad : छत्रपती संभाजीनगरमध्ये गुटखा तस्करांनी 'अन्न व औषध प्रशासन' (FDA) च्या पथकावर जीवघेणा हल्ला झाला आहे. गुटखाविरोधी कारवाईदरम्यान एका महिला अधिकाऱ्याच्या अंगावर भरधाव वाहन घालण्याचा प्रयत्न झाला.

Bharat Jadhav, माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

  • गंगापूर तालुक्यात FDAच्या पथकावर जीवघेणा हल्ला.

  • महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्या अंगावर वाहन घालून ठार मारण्याचा प्रयत्न.

  • गुटखा माफियांनी अधिकाऱ्यांना धमकावत गुटख्याने भरलेला ट्रक पळवून नेला

अवैध गुटख्यावर कारवाई करायला गेलेल्या अन्न व औषध विभागाच्या पथकावर गुटखा माफियांनी जीवघेणा केला आहे आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालक्यातील रहीमपुर इथे ही घटना घडली. कारवाई करताना गुटखा माफियानी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेराव घालत शिवीगाळ करत धमक्या दिल्या.

गुटखा माफियांनी महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्या अंगावर भरधाव वाहन घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी गुटख्याने भरलेला ट्रकही पळवून नेला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मंत्री नरहरी झिरवळ आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतली आहे.

याप्रकरणी अधिकची माहिती अशी की, मंगळवारी सहाय्यक आयुक्त विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दीकी, प्रज्ञा सुरसे, नमुना सहाय्यक अमोल कांबळे यांचे पथक रहिमपूरात गेले होते. तेथे उभ्या असलेल्या एमएच-१६-सीडी-८२९६ क्रमांकाच्या ट्रकची तपासणीत त्यात गुटखा व पानमसाल्याची २५ ते ३० मोठी पोती आढळली.

पथकाने तातडीने कारवाई सुरू करून पोलिस मदतीची मागणी केली. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच काळ्या रंगाची विना क्रमांकाचे वाहन भरधाव वेगाने तेथे दाखल झाले. जीपमधून उतरलेल्या आरोपींनी करत अधिकाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की, जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने वाळूज पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली, त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FDA ची मराठवाड्यात धडक मोहीम; 27 ठिकाणी छापेमारी

छत्रपती संभाजीनगर विभागात भेसळ करणाऱ्यांविरोधात धडक मोहिम सुरु असून, याअंतर्गत १ जून ते ९ जूनपर्यंतच्या अवघ्या नऊ दिवसांत २७ ठिकाणी धाडी टाकून तब्बल दोन कोटी ४७ लाख ७५ हजार रुपयांचा प्रतिबंधित आणि संशयित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.गुटखा, सुगंधी तंबाखू तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोठी धडक मोहीम राबवली आहे. 01 जून ते 9 जून 2026 या कालावधीत मराठवाड्यात एकूण 27 ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात आज कॉकरोच जनता पार्टीचे आज आंदोलन

आता नोकऱ्या कमी होणार? TCSमध्ये AIचा वापर वाढवला

ठाकरेंच्या शिलेदाराला केंद्रात मंत्रिपदाची ऑफर; 7 खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा

नाफेडकडून शेतकऱ्यांची थट्टा;आता म्हणे 1800 चा दर देणार

Fact Check: मोदींचा नारा, सोनं विका बँकेत पैसे ठेवा? पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन?

SCROLL FOR NEXT