Amravati News, Gurudas Baba Amravati, Gurudas Maharaj Amravati, Social Media, Viral Video, Video Viral
Amravati News, Gurudas Baba Amravati, Gurudas Maharaj Amravati, Social Media, Viral Video, Video Viral saam tv
महाराष्ट्र

Saam Impact : आश्रमातून Chulivarcha Baba गायब, दरबार भरलाच नाही (पाहा व्हिडिओ)

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- अमर घटारे

Chulivarcha Baba : मी कुठलेही अंधश्रद्धेचे काम करत नाही. मला दैवी शक्ती प्राप्त होते असे म्हणा-या समाज माध्यमातून व्हायरल हाेत असलेल्या बाबांचा रविवारी दरबार भरलाच नाही. त्यामुळे त्यांच्या असंख्य भक्तांना बाबांच्या दर्शनाविनाच परतावे लागले. साम टीव्हीने समाज माध्यमात व्हायरल हाेत असलेल्या व्हिडिओमधील चूलीवरचे बाबा (chulivarcha baba) काेण आहेत आणि त्यांचे व्हिडिओबद्दलचे (viral video) मत नुकतेच जनतेसमाेर आणले हाेते. (Maharashtra News)

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डी येथील एका चुलीवरच्या बाबाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. श्री संत सच्चिदानंद गुरुदास महाराज (Gurudas Maharaj) नावाचा भोंदूबाबा चर्चेत आला आहे. या भोंदू बाबाचा साम टिव्हीने भांडाफोड केला. या बाबाने आपल्याला दैवी शक्ती असल्याचे म्हटले आहे तर आता याच भोंदू बाबाचे आणखी दोन व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागले आहेत.

हा भोंदू बाबा पुन्हा एकदा जळत्या लाकडांवर बसून दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओत तप्त भाजीच्या गंजावर झाकून ठेवलेल्या झाकणावर जाउन बसत असून त्याच्या या वर्तनाला भक्त दैवी चमत्कार समजत आहेत.

त्यामुळे भोळ्या भाबड्या भक्तांच्या भावनांसोबत सोबत खेळणाऱ्या भोंदू बाबावर पोलीस कारवाई का करत नाही असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. दर रविवारी, गुरुवारी आश्रमात बाबाचा दरबार भरला जातो. साम टीव्हीच्या बातमी नंतर बाबाचा दरबार रविवारी भरला नाही. अनेक भक्त त्याच्या दर्शनाविना परतल्याचे दिसून आले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voting Awareness : मतदान जनजागृतीसाठी गुरुजी बनले वासुदेव; भक्तीगीतांच्या माध्यमातून पटवताय मतदानाचे महत्त्व

Live Breaking News : ईव्हीएम हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे मागितले दीड कोटी

Shekhar Suman : शेखर सुमन यांचा भाजप प्रवेश; कंगना रणौतचा प्रचार करणार का?

Loksabha Election: उत्सव लोकशाहीचा! सेलिब्रिटी ते राजकीय मंडळी; 'या' दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्का; PHOTO

Nagpur News : महिलेचा मोबाईल नंबर घेण्यासाठी लावली ५० हजाराची पैज; तिघे मित्र पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT