Maharashtra Ban To Gunaratna Sadavarte 
महाराष्ट्र

Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रात बंदी घाला; मराठा समाजाची मागणी

Maharashtra Ban To Gunaratna Sadavarte : जालन्यातील रामनगरमधील नागरिकांनी अंबड चौफुली ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला.

Bharat Jadhav

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना जालना जिल्हासह महाराष्ट्रात बंदी घालावी, ही मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलीय. सदावर्तेंना महाराष्ट्रात बंदी घालावी या मागणीसाठी जालन्यातील रामनगर आणि परिसरातील नागरिकांनी आज अंबड चौफुली ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला. अँड गुणरत्न सदावर्ते हे जालन्यात येऊन जाती-जातीमध्ये वाद लावण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील यावेळी आंदोलकांनी केलाय.

काही दिवसापूर्वी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी जालन्यात येऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी रामनगर येथील जुन्या वादातून झालेल्या वादाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप निवेदनकर्त्यांनी केलाय. दरम्यान आज जालन्यातील रामनगर आणि परिसरातील नागरिकांनी एकत्र येत अंबड चौफुली ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.

मराठा आरक्षणाचा नाद सोडा - सदावर्ते

काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्ते हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. मनोज जरांगे यांच्यामुळेच मराठा समाजाचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला.

त्यामुळे जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडावा, असा सल्ला गुणरत्न सदावर्ते यांनी दिला होता. सदावर्ते हे लातूर दौऱ्यावर होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना आरोपही केले. मनोज जरांगेंमुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान झालंय. आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्लूएसच्या माध्यमातून मिळणारे मराठा विद्यार्थ्यांचे आरक्षण गेलंय. त्यामुळे आता पाच टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण मराठा विद्यार्थ्यांना मिळत आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडावा, असे सदावर्ते यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ₹14.10 लाख? 8व्या वेतन आयोगाचं संपूर्ण गणित समजून घ्या

Mandwa Gateway Of India Ferry : आता अलिबाग फक्त 'इतक्या' मिनिटांत! गेटवेपासून बोट सेवा पुन्हा सुरु; पाहा नवी वेळ आणि तिकीट

Maharashtra News Live Update: राहुल गांधींवरील एफआयआरच्या निषेधार्थ काँग्रेसचे तीव्र आंदोलन

Fruit Juice And Blood Sugar: फळांचा ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

मोठी दुर्घटना! समुद्रात बोट उलटली; भाजप नेत्याचा दुर्दैवी मृत्यू, कोकणाच्या राजकारणावर शोककळा

SCROLL FOR NEXT