Nashik Jindal Company Fire: ३ दिवसांपासून धुमसतेय जिंदाल कंपनीतील आग; १ KMचा परिसर केला रिकामा

Nashik Jindal Company Fire Update: शॉर्ट सर्किटमुळे जिंदाल कंपनीत आग लागल्याचे सांगितले जात आहे. कंपनीच्या चार नंबर गेटच्या मागील शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल साठवलेले होते. तीन दिवसांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 Jindal Company Fire Update
Nashik Jindal Company Fire Update
Published On

गेल्या तीन दिवसांपासून जिंदाल कंपनीमधील आग धुमसतेय. तीन दिवसांपासून आग शमविण्याचे प्रयत्न केलं जात आहे. परंतु अद्याप अग्निशामक दलाला यात यश आले नाहीये. कच्चा माल, केमिकल तसेच प्लास्टिकमुळे आगीचा भडका होत असल्यानं प्रशासनाने कंपनीपासूनचा १ किलोमीटरचा परिसर रिकामा केलाय. प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलाय. दरम्यान १५ किलोमीटरचा परिसरावर धोक्याची घंटा आहे. ( Nashik Jindal Company Fire)

नाशिक-मुंबई महामार्गालगत जिंदाल कंपनी आहे. तीन दिवसांपूर्वी या कंपनीला आग लागली होती. अद्याप आगीवर नियंत्रण मिळवता आले नाहीये. पॉलिफिल्म बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्चा माल आणि रसायनांमुळे आग अनियंत्रित झालीय. कंपनीच्या परिसरात गॅस टाकी आहे, या गॅस टाकीचा स्फोट झाला तर १५ किलोमीटरचा परिसर उद्धवस्त होऊ शकतो.

गॅस टाकीचा ब्लास्ट होऊ नये म्हणून अग्निशमन दलाकडून या टाकीच्या परिसरात सातत्याने पाणी आणि फोम फवारणी केली जातेय. गॅस टाकीचा स्फोट होऊ नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत दोन कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळालीय. गेल्या ४८ तासांपासून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक, ठाणे, मुंबई, मालेगाव महापालिका आणि इतर नगरपालिकांमधून ३० ते ४० अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवण्यात आलेत. पाणी आणि फोमच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केली जात आहेत.

 Jindal Company Fire Update
Vaishnavi Hagawane Death Case: माझ्या नवऱ्यासह मलाही मारलं, मोठ्या सुनेचे धक्कादायक आरोप; फोटो व्हायरल

दरम्यान आगीत स्फोटांचे आवाज होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पूर्ण कंपनीला आग लागल्यास साडेसहा हजार कोटींचे नुकसान होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. नाशिक महापालिकेचे प्रभारी अग्निशमन अधिकारी प्रदीप बोरसे या घटनेप्रकरणी माहिती देताना सांगितले की, या आगीत जिंदाल कंपनीचा एक पूर्ण प्लँट आगीच्या भक्ष्यस्थानी गेलाय. कंपनीमध्ये वापरले जाणारे पाणी आग विझवण्यासाठी अपुरे पडत आहे.

इतर कंपन्यांकडूनही पाणी मागवले जातंय. दरम्यान या आगीत सर्वात धोक्याची बाब म्हणजे कंपनीच्या आवारात LPG टाकी आहे. या टाकीचे तापमान वाढू नये, यासाठी सतत पाणी व फोमचा मारा करून तापमान नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com