Gunaratna Sadavarte Manoj Jarange x
महाराष्ट्र

Gunaratna Sadavarte : मनोज जरांगेंविरोधात पोलिसांत तक्रार, कोर्टाच्या नियमांचे पालन न केल्याचा सदावर्तेंचा आरोप

Gunaratna Sadavarte Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरुन गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.

Yash Shirke

  • गुणरत्न सदावर्तेकडून जरांगेंविरोधात पोलिसांत तक्रार

  • कोर्टाच्या नियमाचे पालन न केल्याचा सदावर्तेंचा आरोप

  • आझाद मैदानावरील आंदोलनाविरोधात सदावर्तेंची तक्रार

Gunaratna Sadavarte Manoj Jarange Patil : राज्यात मराठा आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलनकर्त्यांसोबत मुंबईत दाखल झाले आहेत. भरपावसात आझाद मैदानात मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावरुन गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

गुणरत्न सदावर्तेकडून जरांगेंविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. कोर्टाचे आणि पोलिसांनी ठरवलेल्या नियमांचे पालन जरांगे पाटील यांनी केले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आझाद मैदानावरील आंदोलनाविरोधात सदावर्तेंनी तक्रार दाखल केली आहे. जरांगे पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ६ वाजेपर्यंत आंदोलनाला परवानगी आहे. ६ वाजल्यानंतर एकही मिनिट थांबू देणार नाही, असे सदावर्ते यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी हायकोर्टाचे, पोलिसांच्या अटींचे उल्लंघन केले आहे. ते कायद्याच्या बाहेर जाऊन सरकारला आव्हान देत आहेत. त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आत्मा हा राजकारण असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईत, आझाद मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनावर टीका केली आहे. मराठा आंदोलनाने लोकांना त्रास होत आहे. यामुळे मुंबईतील उद्योगांवर परिणाम झाला आहे. बजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागर अशा काही नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे. पाठिंबा देणाऱ्या नेत्यांवरही कारवाई व्हावी अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv Crime: जमिनीच्या वादानं आणलं भावकीत वैर; चुलत्यानं २१ वर्षीय पुतण्याला संपवलं

Maharashtra News Live Update:भोंदू राजेंद्र गडगे याला घेऊन पोलिस पोहचले दत्तधाम आश्रमात...

Fatty Liver Detox: काय सांगता? दारु न पिताही लिव्हर होतो खराब, 'या' ७ घातक सवयी कारणीभूत ठरतात

Crime News: महिलेने घेतला तरूणाच्या प्रायव्हेट पार्टचा चावा; घरी पोहोचताच व्यक्तीचा मृत्यू

५ कोटींच्या MDMA गोळ्या जप्त, महिला सप्लायर अटकेत; मुंबईत खळबळ

SCROLL FOR NEXT