नाशिक : जळगांव Jalgaon जिल्ह्यात 3500 हेक्टर केळीचं नुकसान झालं असून अनेक घरांच, शेत जमीनीचं प्रचंड नुकसान Loss झालं आहे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रत्येकाचा पिकपेरा वेगळा असल्यानं सरसकट मदत देता येत नाही. तसेच राज ठाकरेंनी मागणी करणं मान्य, मात्र मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. (Gulabrao Patil's statement regarding Raj Thackeray)
हे देखील पहा -
राज्यातील मराठवाडा Marathwada आणि विदर्भात Vidarbha पावसाने हाहाकार माजवला आहे या पाणी संकटाने सर्वात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांच Farmers Loss झालं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती राज्यातील सत्ताधारी सोडून इतर सर्व राजकीय पक्षांनी सरकारने ओला दुष्काळ Wet drought जाहीर करावा आणि तत्काळ सरसकट पंचनाम्यांची वाट न बघता मदत करावी अशी मागणी केली आहे. "राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजार रुपयांची तातडीची मदत द्या, तसेच पंचनामे होत राहतील. मात्र आधी शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांना मदत द्या," अशी आक्रमक मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे.
याच मागणीवरती प्रतिक्रीया देताना जळगावचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील Gulabrao Patil यांनी राज ठाकरेंवरती निशाना साधला आहे. ' राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य, मात्र मागणी करणं सोपं तसेच सर्व निर्णय पंचनाम्यानंतर जिथे परिस्थिती असेल तिथे ओला दुष्काळ जाहीर होणारच आणि राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
पंचनामे केल्यानंतरच मदत
शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करूनच शेतकऱ्यांना मदत देणार असून सरसकट पंचनामे हे ओला दुष्काळ म्हणून सरकारने नोंद घेतली आहे तसेच कॅबिनेट Cabinet मध्ये पूर्ण माहिती आल्यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचही ते म्हणाले.
राजकारण करू नका
केंद्र सरकारने Central Goverment जीएसटीचे GST 50 हजार कोटी दिले नाही, शेतकऱ्यांना काय मदत देणार? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. केंद्र काही मदत देत नाही असही ते यावेळी म्हणाले आहेत तर कालच देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी देखील सरकारवर टीका केली आहे "शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या पोकळ आश्वासनं देवू नका" अशी टीका फडणवीस यांनी राज्य सरकारवरती केली आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.