'शेतकऱ्यांना सरसकट मदत नाही, सरकारच्या नियमाप्रमाणे मदत मिळणार'

राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शेतकरी पुरता बेजार झाला आहे. मराठवाड्यात तर शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेलं पिक वाहून गेलं आहे.
'शेतकऱ्यांना सरसकट मदत नाही, सरकारच्या नियमाप्रमाणे मदत मिळणार'
'शेतकऱ्यांना सरसकट मदत नाही, सरकारच्या नियमाप्रमाणे मदत मिळणार'Saam TV
Published On

नाशिक: पुढील 4 ते 8 दिवसांत शेतीच्या नुकसानीचे (Agricultural Loss) पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असं आश्वासन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी साम टिव्हीशी बोलतांना दिलं आहे. मात्र सरसकट मदतीच्या शेतकऱ्यांच्या मागणीला बगल देत राज्यसरकारच्या (State Government) मदतीच्या नियमाप्रमाणेचं शेतकऱ्यांना मदत केली जाणार असल्याचं दादा भुसे यांनी म्हटलं आहे. राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शेतकरी पुरता बेजार झाला आहे. मराठवाड्यात तर शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेलं पिक वाहून गेलं आहे.

'शेतकऱ्यांना सरसकट मदत नाही, सरकारच्या नियमाप्रमाणे मदत मिळणार'
Video: रस्त्यावरील गायींची इनोव्हा गाडीतून तस्करी; घटना CCTV मध्ये कैद

अतिवृष्टीमुळे राज्यातील 28 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं असल्याची माहिती कृषीमत्री दादा भुसे यांनी दिली. पुढे ते म्हणाले ''ऑगस्टपासून राज्यातील 21 जिल्हे अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहेत. पुढच्या 4 ते 8 दिवसांत पंचनामे पूर्ण केले जातील''. सरसकट मदत नाही तर सरकारच्या नियमाप्रमाणे मदत मिळणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. नुकसानीची आकडेवारी संकलित झाल्यानंतर मदतीसंदर्भात धोरण ठरवलं जाईल त्याचबरोबर शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्यासाठी राज्यसरकार कटिबद्ध असून शेतकऱ्यांना मदतीसाठी मुख्यमंत्री लवकरचं निर्णय घेतील असे आश्वासन कृषीमंत्र्यांनी दिले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल असे भुसेनी सांगितले.

दरम्यान अतिवृष्टिने मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालन्यामध्ये पावसाने शेतची प्रचंड नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. शेतकरी हवालदिलं झाले आहेत त्यामुळे शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com