Gudi Padwa 2023, Pandharpur, Shirdi saam tv
महाराष्ट्र

Gudi Padwa 2023 : साई मंदिराच्या कळसावर श्रद्धा, सबूरीची गुढी; पंढरपूरात फुलांच्या सजावटीमुळे देवाचे रूप अधिकच खुलले (पाहा व्हिडिओ)

साईबाबांच्या मुर्तीला साखरेच्या गाठीची माळा परिधान करण्यात आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सचिन बनसाेडे, भारत नागणे

Gudi Padwa Celebration : गुढी पाडवा निमित्त (gudi padwa) राज्यभरातील भाविक शिर्डी (shirdi) आणि पंढरपूरात (pandharpur) देवाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. दाेन्ही शहरात माेठा उत्साह आहे. शिर्डीतील साई मंदिरावर श्रद्धा सबुरीची गुढी उभारली गेली आहे. पंढरपूरातील मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

साईबाबांच्या शिर्डीत गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचा उत्साह दिसून येतोय. साई मंदिराच्या कळसावर पारंपारिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली आहे. साई संस्थान तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून गुढी उभारली.

सर्व धर्म समभावाची शिकवण देणा-या साईबाबांच्या शिर्डीत वर्षभरातील प्रत्येक सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्याची परंपरा आहे. आज मराठी नववर्षाचे स्वागतही मोठ्या उत्साहात पार पडत आहे.

आज साईबाबांच्या मुर्तीला कोट्यावधी रूपयांच्या आभुषणांसह साखरेच्या गाठीची माळा परिधान करण्यात आली. साईदर्शनाने नववर्षाची सुरूवात करण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरात विविध फुलांची सजावट

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध देशी विदेशी‌ फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. ही सजावट रांजणगाव येथील भाविक नानासाहेब पाचनकर यांनी केली आहे.

देवाचे प्रवेशद्वार,सोळखांबी,सभामंडप या ठिकाणी फुलांची सुंदर अशी सजावट केली आहे. सजावटीसाठी शेवंती ४५० किलो, पिंक कन्हेर ४० किलो, अस्तर ४० किलो, झेंडू १०० किलो आणि गुलाब ५० गड्डी अशा विविध सुमारे 600 किलो फुलांचा वापर केला आहे.

फुलांच्या सजावटीमुळे देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी व फुलांची सजावट ‌पाहण्यासाठी भाविकांनी पहाटे पासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : नगराध्यक्षांपाठोपाठ आता नगरसेवकांचेही ठरले; काहींचे गणित जमले तर काहींचे बिघडले

Maharashtra Live News Update: नागपुरात सकल ओबीसी समाजाचा उद्या महामोर्चा निघणार

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

SCROLL FOR NEXT