SSC Exam 2023 : हद्दच झाली राव ! विद्यार्थ्यांच्या दगडफेकीत शिक्षक रक्तबंबाळ, गुन्हा दाखल

मनमाड पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.
manmad police, ssc exam 2023, teacher, students
manmad police, ssc exam 2023, teacher, studentssaam tv

- अजय सोनवणे

Manmad : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने (student) शिक्षकावर (teacher) हल्ला केल्याची घटना मनमाड शहरात घडल्याचे समाेर आले आहे. परीक्षेत (ssc exam latest news) काॅपी करुन दिली नाही याचा राग मनात धरुन शिक्षकावर हल्ला झाल्याची माहिती पाेलिसांकडून मिळाली. या घटनेचा कसून तपास सुरु असल्याची माहिती मनमाड पाेलिसांनी (manmad police) दिली. (Maharashtra News)

manmad police, ssc exam 2023, teacher, students
Chandrapur : आत्महत्येपुर्वी सेल्फी काढत युवतीने Social Media च्या माध्यमातून केले सर्वांना Good Bye...

शिक्षक निलेश जाधव यांनी पाेलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीत परीक्षा काळात कॉपी करु दिली नाही या रागातून पेपर सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी माझ्यावर दगडफेक केली. या घटनेत माझ्या डाेक्याला जबर मार लागला आहे.

manmad police, ssc exam 2023, teacher, students
Mahila Maharashtra Kesari Kusti : कुस्तीच्या पंढरीत दिपाली सय्यदांनी ठाेकला शड्डू... खरं मैदान आमचंच (पाहा व्हिडीओ)

दरम्यान सुपरव्हिजनचे काम करणा-या निलेश जाधव यांना पेपर सुटल्यावर काम संपवून घरी जात असताना शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या घोळक्यातून काही मुलांनी दगडफेक केल्याने पालकांनी देखील तीव्र नाराज व्यक्त केली आहे.

शिक्षक जाधव यांच्या तक्रारीनंतर मनमाड पोलिसांनी संध्याकाळी उशिरा अज्ञात विद्यार्थी यांच्यावर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com