Chhatrapati Shivaji Maharaj  Saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Shivaji Maharaj : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण; काय आहेत प्रमुख वैशिष्ट्ये? वाचा

chhatrapati shivaji maharaj statue inauguration : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण झालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला.

Saam Tv

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर कोसळलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही महिन्यात नव्याने उभारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित मंत्रिमंडळतील इतर प्रमुख मान्यवरांनीही हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा एकदा तेजाने, स्वाभिमानाने, भव्यतेने उभा झाल्याचा आनंद झाला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण झाल्यावर दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा एकदा तेजाने, स्वाभिमानाने आणि पूर्वीपेक्षाही भव्यतेने उभा झाला, याचा आनंद आणि समाधान आहे. मागील काळात झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विक्रमी वेळेत पुन्हा प्रस्थापित करु असा निर्धार केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या याच पुतळ्याचे आज पूजन केले, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वादळे येतात. या वादळांच्या इंटेन्सिटीचा अभ्यास करुन, त्यापेक्षाही अधिक इंटेन्सिटीचे वादळ आले तरी पुतळा उभा राहू शकेल, अशी रचना करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा देशामधील बहुधा हा सर्वात उंच पुतळा असू शकेल. या पुतळ्याची उंची 60 फूट, तलवारीसह उंची 83 फूट आणि जमिनीपासून संपूर्ण रचनेची उंची 93 फूट इतकी आहे. किमान 100 वर्षे कोणत्याही प्रकारच्या वातावरणात टिकेल इतकी मजबुती या पुतळ्याची आहे. पुतळा उभारणाऱ्यांकडेच त्याच्या देखभालीचीदेखील जबाबदारी देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या परिसरातील उपलब्ध होणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण करुन व्यवस्था उभ्या करण्यात येणार आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना स्वराज्याचा अनुभव यावा, येथील भव्यता पाहता यावी, अशाप्रकारे या परिसराचा विकास करण्यात येणार आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाद्वारे कोकणाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खा. नारायण राणे, आ. कालिदास कोळंबकर, आ. दिपक केसरकर, आ. रविंद्र चव्हाण, आ. निलेश राणे, आ. निरंजन डावखरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

Maharashtra News : दिवाळीसाठी एसटीच्या ९०० विशेष फेऱ्या, कुठून किती बस धावणार?

SCROLL FOR NEXT