Chhatrapati Shivaji Maharaj statue: चमके शिवबाची तलवार...! राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण, वैशिष्ट्ये काय? पाहा व्हिडिओ

Rajkot Fort: गेल्यावर्षी मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला होता. यावरून राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले होते.

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण पार पडले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होते. या नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काम झाल्याची माहिती समोर आली आहे.

या पुतळ्याचे काम कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्या देखरेखेखाली काम सुरू होते. गेल्यावळी हा पुतळा 31 फुटाचा होता. आता 83 फुटांचा दिमागदार आणि शानदार असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. राम क्रिएशन आर्टचे शिल्पकार राम सुतार यांनी हा भव्य दिव्य पुतळा उभारला आहे.

हा पुतळा आठ एमएम जाडीच्या कास्य धातुपासून बनला आहे. महाराजांच्या हातातील तलवार 15 फुट लांबीची आहे.

200 किलोमीटर वाऱ्याला देखील हा पुतळा सामोरे जाईल. या पुतळ्याच्या उभारणीला 31 कोटींहून अधिकचा खर्च केल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com