gram panchayat election result 2022, amravati, congress , shivsena, ncp saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Election Result 2022 : काँग्रेसचा हात भारी; राष्ट्रवादीसह सेना, शिंदे गट भुईसपाट

आपला उमेदवार विजयी झाल्याचे समजताच समर्थकांनी गुलालाची उधळण केली.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Gram Panchayat Election Result 2022 : अमरावती (amravati) जिल्ह्यात रविवारी पाच ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. आज तासाभरात मतमोजणी पार पडली. जिल्ह्यातील पाच पैैकी तीन ग्रामपंचायतींवर (grampanchayat) काॅंग्रेसनं (congress) सरपंचपद मिळविलं आहे. सर्मथकांचा विजय हाेताच कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला.

तिवसा तालुक्यात माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांच्या नेतृत्वाखाली उंबरखेड ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी काँग्रेसचे नितीन कळंबे, घोटा ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसच्या रुपाली राऊत व कवाड गव्हाण ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी काँग्रेसच्या मोहिनी चौधरी या विजयी झाल्या आहेत. तिवसामध्ये तिन्ही ग्रामपंचायतवर यशोमती ठाकूर यांच्या काँग्रेसने बाजी मारली आहे.

चांदुररेल्वे तालुक्यातील चांदुरवाडी ग्रामपंचायतमध्ये भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वाखाली सरपंचपदी भाजपच्या वर्षा माताडे विजयी झाल्या. तसेच धारणी तालुक्यातील हरिसार ग्रामपंचायतमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे रामेश्वर दारशिंबे विजयी झाले.

राज्यात शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर प्रथमच सरपंच पदाची निवडणूक जनतेतुन झाली. यामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना व शिंदे गटाला एकही जागा जिंकता आलेली नाही. दरम्यान काॅंग्रेसच्या विजयी उमेदवारांचे त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लाेष केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT