Sangola Gram Panchayat Election 2022  Saam TV
महाराष्ट्र

Gram Panchayat Election : सांगोल्यात शिंदे गटाचे दोन सरपंच बिनरोध; आमदार शहाजीबापू पाटलांची बाजी

सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी शेकापला मोठा धक्का दिला.

भारत नागणे

Sangola Gram Panchayat Election 2022 : सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी शेकापला मोठा धक्का दिला. सांगोल्यातील चिणके, पाचेगाव आणि बलवडी या तीन ग्रामपंचायतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने पहिल्याच निवडणुकीत वर्चस्व मिळवले आहे.  (Latest Marathi News)

चिणके व पाचेगाव या दोन ग्रामपंचायतीचे (Gram Panchayat) सरपंच तर बलवडी ग्रामपंचायतीचे 8 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. आमदार शहाजीबापू पाटील‌ आणि दिपक साळुंखे गटाने या तिन्ही ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने झेंडा फडकावला आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी चिकणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमदार पाटील व दीपक साळुंखे गटाचे नाथा खंडागळे तर पाचेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगिता भोसले या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

दुसरीकडे बलवडी ग्रामपंचायतीच्या ११ पैकी ८ सदस्य आमदार पाटील गटाचे बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण ६ पैकी तीन ग्रामपंचायतीवर आमदार पाटील गटाने वर्चस्व मिळवले आहे.

तर उर्वरीत चिंचोली, अनकढाळ आणि शिवणे या तीन ग्रामपंचातीमध्ये आमदार पाटील गट आणि शेकापमध्ये सरळ लढत होत आहे. सांगोला तालुक्यात आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांची युती आहे.

दरम्यान, बिनविरोध निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांचा सत्कार युवा सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. विधानसभेची लिटमस चाचणी म्हणून समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वात शिंदे गटाने बाजी मारल्याने कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील या गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

Ashton Agar: वाघाचं काळीज लागतं! दुखापतग्रस्त असूनही पठ्ठ्या मैदानात आला अन् एका हाताने केली फलंदाजी -VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस बारामती विमानतळावर येणार

SCROLL FOR NEXT