Gujarat Election 2022 : गुजरात, हिमाचलमध्ये कुणाची सत्ता? आज होणार फैसला, AAP इतिहास घडवणार?

संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या गुजरात आणि हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.
Gujarat Election 2022
Gujarat Election 2022 Saam TV

Gujarat Assembly Election 2022 Result : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या गुजरात आणि हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या दोन्ही राज्यांची सूत्रे कोणाच्या हातात जाणार हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. आज सकाळी ८ वाजेपासून दोन्ही राज्यांतील मतमोजणीला सुरुवात होईल आहे. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Gujarat Election 2022
Gaujrat Election Result 2022 : गुजरात निवडणुकांचे निकाल कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचे अनेक स्टार प्रचारक गुजरातमध्ये तळ ठोकून होते. एक्झिट पोलच्या निकालात देखील भाजपबहुमत मिळवेल असा विश्वास व्यक्त केला गेला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat) अरविंद केजरीवाल यांचा AAP हा नवा स्पर्धक असल्याने राज्यातील काँग्रेसच्या मतांचा वाटा कमी होण्याची अपेक्षा आहे. गुजरात निवडणुकीत भाजपने भाजपने राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनाच मुख्यमंत्रीपदाची उमेदवार म्हणून जाहीर केले होते. तर आम आदमी पक्षाने इसुदान गढवी यांना गुजरातचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते.

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील मतमोजणी केंद्रांभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 182 सदस्यीय राज्य गुजरात विधानसभेसाठी बहुमताचा आकडा 92 आहे. गुजरातमध्ये एकूण 64.33 टक्के मतदान झाले आहे. हिमाचल प्रदेशात 12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात 68 जागांसाठी मतदान झाले होते. हिमाचल प्रदेशमध्ये 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. या दोन्ही राज्यात कोण सत्तेत येणार याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे गुजरातबरोबरच हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी सुद्धा आज मतमोजणी होणार आहे. हिमाचलप्रदेशात 59 ठिकाणी उभारण्यात आलेल्या 68 केंद्रांवर सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल. सुरुवातीला पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सुरू होईल. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता ईव्हीएमवरून मतमोजणी होईल. या निवडणुकीत एकूण 412 उमेदवार रिंगणात आहेत.

गुजरातमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार

गुजरात निवडणुकीतील एक्झिट पोलनुसार भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचा अंदाज आहे. एक्झिट पोलनुसार भाजपला राज्यात 110-125 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 45-60 जागा मिळू शकतात आणि आम आदमी पक्ष 1-5 जागा मिळवू शकतो. दुसरीकडे, इतर पक्षांना 0-4 जागा मिळण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com