Gaujrat Election Result 2022 : गुजरात निवडणुकांचे निकाल कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या सविस्तर

गुजरातमधील 33 जिल्ह्यांमध्ये 1 आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या.
Gujrat Election
Gujrat ElectionSaam TV
Published On

Gaujrat Election Result 2022 : गुजरात विधानसभा निवडणूक 2022 चे निकाल गुरुवारी म्हणजेच 8 डिसेंबर रोजी जाहीर होतील. एक्झिट पोलच्या निकालांवर नजर टाकल्यास, राज्यात भाजप पुन्हा एकदा स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन करणार आहे.

मात्र खरा निकाल मतमोजणीनंतरच समोर येईल. गुजरातमधील 33 जिल्ह्यांमध्ये 1 आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. (Latest Marathi News)

Gujrat Election
Eknath Khadse : 'कुणाचे बोट धरून, पाय चाटून मोठा झालो नाही'; एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर जहरी टीका

मतमोजणी कधी सुरु होईल?

आता मतमोजणी गुरुवारी सकाळी 8 वाजता सुरू होईल. साधारणपणे सकाळी 10 नंतर चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात होईल. गुजरातमधील 182 विधानसभा जागांसाठी 37 मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी होणार आहे.

निकाल कुठे आणि कसा पाहता येईल

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2022 चे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही भारतीय निवडणूक आयोग (ECI) results.eci.gov.in च्या वेबसाइटला भेट देऊ शकता. याशिवाय तुम्ही https://www.saamtv.com/ आणि https://www.youtube.com/watch?v=8ZP0Urr_B1c या साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उद्या पाहू शकाल.

Gujrat Election
Delhi MCD Election Result: दिल्ली 'आप'ची, भाजपला दे धक्का; 15 वर्षांची सत्ता उलथून महापालिकेवर आपचा कब्जा

किती मतदान झालं?

गुजरात निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान झाले. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत 63.31 टक्के मतदारांनी मतदान केल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत सुमारे 59.11 टक्के मतदारांनी मतदान झाले.

एक्झिट पोलनुसार भाजप सत्ता स्थापन करणार

गुजरात निवडणुकीतील एक्झिट पोलनुसार भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचा अंदाज आहे. एक्झिट पोलनुसार भाजपला राज्यात 110-125 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 45-60 जागा मिळू शकतात आणि आम आदमी पक्ष 1-5 जागा मिळवू शकतो. दुसरीकडे, इतर पक्षांना 0-4 जागा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com