aditya thackeray and eknath shinde Saam TV
महाराष्ट्र

Aditya Thackeray vs CM Eknath Shinde: आदित्य ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना नवं चॅलेन्ज, मुख्यमंत्री आव्हान स्वीकारणार का?

अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बदलून दाखवावं

साम टिव्ही ब्युरो

जालना : शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार  आदित्य ठाकरे  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून, त्यानंतर ठाण्यातून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मी छोटी आव्हानं स्वीकारत नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. मात्र आता आदित्य ठाकरेंनी एकनाश शिंदे यांना नवं आव्हान दिलं आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बदलून दाखवावं असं आव्हान आता आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

गेल्या अनेक दिवसापासून राज्यपाल महापुरुषांचा अपमान करत आहेत. तरीही ते राज्यपाल पदावर आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राज्यपालांचं भाषण होण्याआधी त्यांना बदलून दाखवा. मात्र त्यांना बदलण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वरळीतील सभेवर बोलताना आदित्य यांनी म्हटलं की, कुणाचा फ्लॉप शो झाला त्यावर मी आनंद व्यक्त करणार नाही. वरळीने दाखवून दिलं आहे की गद्दारी कोणालाच पटलेली नाही.

कोळी बांधव काल भलत्याच राज्यातले होते, हे मी एका चॅनेलवर बघितलं. कालच्या सभेला खर्च्यांची गर्दी झाली होती, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री गुवाहाटीला झाडी, डोंगर बघायला गेले होते. तर डावोसला ते बर्फ बघायला गेले होते, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. 28 तासात 40 कोटी खर्च कसा झाला, असा प्रश्न मला पडला होता. त्यावर त्यांच्याशी चर्चा करावं म्हटलं, पण त्यांच्याकडून कोणतंय उत्तर आलं नाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indrayani : इंद्रायणीची घोषणा! दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर होणार शाळेची पायाभरणी, कोण असणार खास व्यक्ती?

Shocking : धक्कादायक प्रकार! अंगणवाडीच्या खाऊमध्ये आढळला मेलेला उंदीर

गर्लफ्रेंडचे अश्लील व्हिडिओ, धमक्या अन् बलात्कार; कल्याणच्या राजकीय पक्षातील तरूणानं प्रेयसीला छळलं

Maharashtra Live News Update : अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर राहणार 20 तास खुले

Garib Rath Express : ब्रेकिंग न्यूज! गरीब रथ ट्रेनच्या ३ एसी बोगीला भयंकर आग, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT