Sanjay Raut explosive allegation against Maharashtra government over Manoj Jarange saam tv
महाराष्ट्र

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maratha Reservation : आता बातमी जरांगेंच्या उपोषणाची. जरांगेंचं उपोषण लांबत चाललंय तसा मराठवाडाही पेटत चाललाय. त्यात आता संजय राऊतांनी जरांगेंच्या आंदोलनाबाबत सरकारवर मोठा आरोप केलाय. नेमका काय आहे हा आरोप? मराठवाडयातल्या गावागावात काय चाललंय? पाहूयात यावरचाच रिपोर्ट.

Suprim Maskar

  • मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

  • संजय राऊत यांनी सरकारवर “जरांगे पाटलांना मारायचंय” असा खळबळजनक आरोप केला

  • जरांगेंचे उपोषण लांबत चालल्याने मराठवाड्यातील मराठा बांधव आक्रमक झालेत.

सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगे पाटलांना भेटण्यास नकार दिल्यानंतर आता ठाकरेसेनेनं सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत.सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. तर मराठा मोर्चाला मूक मोर्चा म्हणाऱ्यांना मराठा आंदोलनावर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका भाजपनं ठाकरेसेनेवर केलीय. दुसरीकडे जरांगेंच्या उपोषणाला 12 दिवस पूर्ण होऊनही सरकार मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय घेत नसल्यानं मराठा आंदोलक आक्रमक झालेत. याचे सर्वाधिक पडसाद मराठवाड्यात उमटले आहेत.

धाराशिवच्या उमरगा तहसील कार्यालयात मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी थेट तहसीलदारांच्या खुर्चीला आग लावून तीव्र निषेध व्यक्त केलाय. जालन्यातील गेवराई बाजार येथेही आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढून ठिय्या मांडला, तर तिकडे नांदेडमध्ये मराठा आंदोलकांनी नांदेड-नागपूर महामार्ग रोखून धरत रास्ता रोको केला. तब्बल तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सोलापुरात तर विद्यापीठासमोरील पाण्याच्या टाकीवर चढत मराठा आंदोलकांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी एका तरुणानं आत्महत्या केलीय.ज्यामुळे लातूरमध्ये मराठा समाज रस्त्यावर उतरला. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीनच चिघळणार असल्याचं दिसतंय.

सरकारनं जरांगेंच्या 15 पैकी 12 मागण्य़ा मान्य केल्यात. मात्र तरीही पूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत उपोषणावर कायम राहणार असल्याची भूमिका जरांगेंनी घेतलीय...त्यामुळे जरांगेंच्या आमरण उपोषणाच्या पवित्र्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारनं जरांगेंची भेट घेणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे मराठा आंदोलक आणखीनच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सरकारनं तोडगा काढला नाही तर आंदोलन राज्यभर पसरण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT