Farmer Saam TV
महाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा; सरकारकडून 157 कोटींची मदत जाहीर

दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 157 कोटीची मदत सरकारने जाहीर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मंत्रालयाशेजारील समुद्रात जलसमाधी आंदोलन करणार असून यासाठी ते मुंबईला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Farmers)  मदत जाहीर केली. दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 157 कोटीची मदत सरकारने जाहीर केली आहे.

दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिरायत पिकांसाठी 13600 रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांसाठी 27000 हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी 36000 रुपये प्रति हेक्टर मदत सरकारने जाहीर केली आहे. (Latest Marathi News)

राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं कापूस सोयाबीन पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. मात्र, सरकारनं शेतकाऱ्यांना कोणतीही मदत केली नाही, असा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.

त्याचबरोबर सोयाबीन आणि कापसाला भाव नाही. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना रात्रीची नव्हे तर दिवसाची लाईट पाहिजे, अशा अनेक मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एक महिन्यांपासून करीत आहे. मात्र, सरकार याची कोणतीही दखल घेत नाही, असा आरोप देखील तुपकर यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळं रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांना घेऊन मुंबईमधील अरबी समुद्रात जल आंदोलन करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दुचाकी फक्त दोनशे, तर चार चाकी वाहनामध्ये दोन हजार रुपयांचे इंधन भरता येणार

अशोक खरात प्रकरणतील पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणारे कोण? नगरमध्ये तिघांविरोधात गुन्हा

Shocking : २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, आईच्या लिव्ह-इन पार्टनरचं भयंकर कृत्य, पीडिता गरोदर राहिली

Diamond Mangalsutra Designs: नव्या नवरीसाठी हे ७ ट्रेंडी आणि एलिगंट डायमंड मंगळसूत्र नक्की ट्राय करा

Priyanka Chaturvedi: खासदारकी गेल्याने प्रियंका चतुर्वेदी संतापल्या? ठाकरेसेनेच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT