Priyanka Chaturvedi: खासदारकी गेल्याने प्रियंका चतुर्वेदी संतापल्या? ठाकरेसेनेच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Shivsena Thackeray Group Meeting: उद्धव ठाकरेंनी बुधवारी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत खासदारकीवरून खडाजंगी झाली. खासदारकी गेल्यामुळे प्रियंका चतुर्वेदी संतापल्या असल्याची माहिती समोर आली.

राज्यसभेच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गटामध्ये खडाजंगी सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यसभेच्या जागेवरून चर्चा झाली. हक्काची जागा हातातून गेल्यामुळे या बैठकीत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदी संतापल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय राऊतांनी खासदारकीसाठी शरद पवारांचं नाव का घेतलं?, असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी केल्याचे सांगितले जात आहे.

शरद पवार यांना पाठिंबा दिल्यामुळे राज्यसभेतील शिवसेनेची हक्काची जागा गेली असे मत अनेकांनी व्यक्त केले. तर इतर खासदारांनी केलेल्या मागणीमुळे आदित्या ठाकरेही नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांनी शरद पवार यांचे नाव का घेतलं असा सवाल करत प्रियंका चतुर्वेदी संतापल्या. या बैठकीनंतर एका खासदाराने प्रियंका चतुर्वेदी यांना ६ वर्षे संधी देऊन काय उपयोग झाला असा सवाल केला. सध्या ठाकरेंच्या या बैठकीची चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com