bhandara, bhandara crime news saam tv
महाराष्ट्र

Bhandara : महिलेवरील सामूहिक अत्याचार प्रकरणातील युवकाच्या शाेधासाठी स्केच तयार

या प्रकरणी दाेघांना यापुर्वी अटक करण्यात आली आहे.

अभिजीत घोरमारे

Bhandara Crime News : भंडारा-गोंदिया (bhandara) जिल्ह्यात एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी भंडारा पाेलिसांनी दाेघांना अटक केली आहे. तिसरा संशयिताचा शाेध सुरु असून पाेलिसांनी आता या प्रकरणात नागरिकांची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानूसार पाेलिसांनी तिस-या संशयित आराेपीचे स्केच तयार करुन ते जनतेपर्यंत पाेहचविले आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधित महिलेवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार झाला. या प्रकरणी लुखा उर्फ अमित सार्वे व मोहम्मद एजाज अंसारी याला अटक करण्यात आले आहे. या दाेन्ही संशयित आराेपींना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले आहे.

दरम्यान या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी शाेधण्यासाठी एसआयटीनं तपासाची चक्रे फिरवली आहेत. आज एसआयटीनं पीडितेचा माहितीवरुन तिसऱ्या संशयित आरोपीचा स्केच तयार केला. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधिताचे वय 30 ते 40 वर्ष असुन दिसायला सावळा रंगाचा व मध्यम बांधा, केस काळे, हलकी दाढ़ी, डाव्या हातात जर्मनच्या कड़ा, डाव्या हाताच्या बोटामध्ये दोन-तीन अंगठ्या, पांढरा रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची फुलपॅंट घटनेवेळीस त्यांनी परिधान केली हाेती. त्यानूसार तयार स्केच करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; १० तोळ्यामागे १५,३०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update : अशोक खरात प्रकरणी थोड्याच वेळात नाशिक न्यायालयात सुनावणी

Kapil Sharma: २० वर्षांच्या कारियरमध्ये केले फक्त ४ चित्रपट, एक हिट तीन फ्लॉप, तरीही आहे कोट्यवधींचा मालक

युद्ध भडकलं! इराणवर सर्वात मोठा हल्ला कधी होणार? ट्रम्प यांनी सांगितली तारीख

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरने जिगरी दोस्ताला केलं एप्रिल फूल; प्रँक पाहून मित्रानेही मारला डोक्यावर हात

SCROLL FOR NEXT