Chess Olympiad : बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत टीम इंडिया 'ब', महिला संघानं पटकाविलं ब्राॅंझ

या यशामुळं देशाच्या बुद्धिबळपटूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
chess olympiad 2022
chess olympiad 2022saam tv
Published On

Chess Olympiad : ममल्लापुरम येथे सुरु असलेल्या ४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खुल्या गटात भारताच्या 'ब' संघास कांस्य पदकावर (Bronze Medal) समाधान मानावे लागले. महिला गटात भारत 'अ' महिला संघाने देखील तिसरे स्थान पटकावले आहे. (Chess Olympiad 2022 Latest Marathi News)

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच भारत 'ब' संघाने अंतिम फेरीत जर्मनीचा (3-1) असा पराभव केला. उझबेकिस्तानने खूल्या गटात अंतिम फेरीत स्पेनचा (2.5-1.5) पराभव करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का.

chess olympiad 2022
Maharashtra Rain : महाराष्ट्राचा तेलंगणाशी संपर्क तुटला; भंडा-यात रेड अलर्ट, उद्या शाळांना सुटी

या स्पर्धेत अव्वल मानांकित भारत 'अ' महिला संघाला अकराव्या फेरीत (अंतिम राऊंड) अमेरिकेकडून पराभव स्विकारावा लागला. यामुळे भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा मावळल्या. कोनेरू हम्पी हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तिसरे स्थान पटकावले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com