Gopinath Munde Saam Tv
महाराष्ट्र

Gopinath Munde: गोपीनाथ मुंडेंची भाजपमध्ये होणारी घुसमट मी जवळून पाहिली, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Raju Shetty On Gopinath Munde: राजू शेट्टी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत मोठं विधान केलं. गोपीनाथ मुंडेंची भाजपमध्ये होणारी घुसमट मी जवळून पाहिली, असे ते म्हणाले.

Priya More
  • राजू शेट्टींचा गोपीनाथ मुंडेंबाबत मोठा दावा

  • २००४ ते २०१४ गोपीनाथ मुंडेंची भाजपमध्ये घुसमट होत होती

  • गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते

  • पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा

योगेश काशिद, बीड

काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते असं विधान त्यांनी केल्यानंतर आता राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याबाबत अनेक राजकीय नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया आल्या. यावर आता शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देत त्यांनी देखील खळबळजनक दावा केला आहे. '२००४ ते २०१४ या कालावधीमध्ये गोपीनाथ मुंडे यांची भारतीय जनता पक्षात होणारी घुसमट मी जवळून पाहिली होती.', असे त्यांनी सांगितले.

राजू शेट्टी हे परळी येथे प्रभुवैद्यनाथाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राजू शेट्टी म्हणाले की, 'युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणाऱ्या झोनबंदीच्या निर्णयाच्या विरोधात शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केले होते. त्यावेळी मुंडे समिती स्थापन करत झोन बंदी उठवण्यात आली होती. तेव्हापासून माझे आणि गोपीनाथ मुंडे यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते.'

' २००४ ते २००९ पर्यंत मी त्यांच्यासोबत आमदार म्हणून काम केले. तसेच २००९ ते २०१४ या काळात देखील मी खासदार म्हणून त्यांच्यासोबत काम केले. त्यांच्या आग्रहाखातरच मी मोठी चूक केली होती ती म्हणजे एनडीएसोबत जाण्याची. परंतु साहेब गेल्यानंतर मी ती चूक सुधारली. २००४ ते २०१४ या दरम्यान गोपीनाथ मुंडे यांची भाजपामध्ये होणारी घुमट मी जवळून पाहिली होती.', असा गौप्यस्फोट राजू शेट्टी यांनी केला.

दरम्यान, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत असा खळबळजनक दावा केला होता की, गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी काँग्रेसमध्ये येणार असल्याचे ठरले होते. त्यांना मंत्रिपद देखील दिले जाणार होते. मंत्रिपद दिले नाही तर नागपूरचे दोघेजण मला निवडणुकीध्ये पाडतील असे त्यांनी आम्हाला सांगितले होते.' पंकजा मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याला आता काहीच अर्थ नाही. मुंडेसाहेब आज ह्यात नाहीत. त्यामुळे आता त्यांच्याविषयी अशा चर्चा करणे औचित्यपूर्ण नाही'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT