अहिल्यानगरमध्ये जनआक्रोश मोर्चादरम्यान गोपीचंद पडळकरांंचं आक्रमक भाषण
नामांतर मान्य नसलेल्या दुकानदारांचा परवाना रद्द करा, पडळकरांची मागणी
त्यांच्या विधानांनी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वाद निर्माण होण्याची शक्यता
सुशील थोरात, साम टीव्ही
अहिल्यानंतर : 'ज्या लोकांना शहरांच नामांतरण झाल्याचे मान्य नाही. त्यांच्यावर कारवाई करा. ज्या-ज्या ठिकाणी अहिल्यानगर आयोजित अहमदनगर लिहिले असेल. त्यांचा दुकान परवाना रद्द करा, असे यावेळी पडळकर यांनी सांगितलं.
अहिल्यानगरमध्ये आज जनआक्रोश मोर्चा झाला. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भाषण केले. आज त्यांनी बोलण्याच्या सर्व मर्यादा सोडल्या. त्यांनी नेहमीप्रमाणे आक्रमक भाषण केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी आमदार संग्राम जगताप हे जिहादींचे बाप असल्याचे सांगितलं. भारत-पाकिस्तान मॅच दरम्यान पाकिस्तान जिंकला आणि कोणी फटाकडे वाजवले, तर ती फटाकडी त्यांच्या गुरुद्वारामध्ये वाजवा असे आव्हान पोलिसांना केले. दुसऱ्या देशामध्ये असे चालले असते का? असा सवाल पडळकरांनी केला. भारतातील महामानवांविषयी चुकीचे वक्तव्य केलं, तर आमचे तरुण ठोकून काढतील, असेही ते म्हणाले.
मंत्री नितेश राणे यांच्या बद्दल दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगरमध्ये झालेल्या एमआयएम पक्षाच्या सभेमध्ये टीका करण्यात आली होती, यावर बोलताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली 'तुम्ही राणे आणि जगताप यांच्यापर्यंत जाण्याआधी थडग्यात जाताल. त्यावर भगवा आणि निळा झेंडा रोवला जाईल, असेही ते यावेळी बोलले.
'भारताची फाळणी झाली, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की, सर्व मुस्लिम समाजाला पाकिस्तानात पाठवून द्या आणि तेथील हिंदू इकडे बोलून घ्या, तसं झालं असतं तर आपल्याला मोर्चा काढायची वेळ आली नसती, असेही यावेळी आमदार गोपीचंद पडळकर बोलले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.