Good news south africa hapus mango enter in kolhapur market yard Saam TV
महाराष्ट्र

Hapus Mango Price: कोल्हापूरच्या मार्केटमध्ये 'हापूस' आंबा दाखल; सव्वा डझनचा भाव तोंडचं पाणी पळवणारा

Alphonso Hapus Mango Price: फळांचा राजा अशी ओळख असणाऱ्या हापूस आंब्याचं कोल्हापूरच्या बाजारपेठेत आगमन झालं आहे. दक्षिण आफ्रिकेतील मलावीतील हापूस आंबे कोल्हापूरमध्ये विक्रीसाठी आले आहेत.

Satish Daud

रणजित मांजगावकर, साम टीव्ही

Alphonso Hapus Mango Price

फळांचा राजा अशी ओळख असणाऱ्या हापूस आंब्याचं कोल्हापूरच्या बाजारपेठेत आगमन झालं आहे. दक्षिण आफ्रिकेतील मलावीतील हापूस आंबे कोल्हापूरमध्ये विक्रीसाठी आले आहेत. कोल्हापूरच्या मार्केट यार्डतील डी.एम बागवान यांच्या पेढीवर हे आंबे आले असून सव्वा डझनच्या बॉक्सचा ३ हजार ८०० रुपये इतका दर आहे.

कोकणच्या हापूस आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. या आंब्याची चवच न्यारी आहे. पण कोकणचा हापूस बाजारपेठेत यायला अजून दोन ते अडीच महिन्यांचा अवकाश आहे. असं असलं तरी आता आंबा मिळणारच नाही, अशी काही परिस्थिती राहिलेली नाही.

परदेशातील आंबे कोल्हापूरच्या (Kolhapur) बाजारात येऊ लागले आहेत. बारमाही फळ देणारी आंब्याची झाड आता उपलब्ध आहेत. शिवाय काही देशांमध्ये आंब्याच्या उत्पादनासाठी हवामान अतिशय अनुकूल असतं. दक्षिण आफ्रिकेतील मलावी इथ हापूस आंब्याचा सिझन सुरू झाला आहे.

कोकणातील हापूस आंब्याच्या मूळ बिजाची मलावी मध्ये लागवड करण्यात आली आहे.याच मलावीतील हापूस आंब्यांचं कोल्हापूरच्या बाजारपेठेत म्हणजे मार्केट यार्ड आगमन झाल्याची माहिती अंबा व्यापारी जुबेर बागवान यांनी दिली आहे.

जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्यात कोकणचा हापूस बाजारपेठेत येतो. पण आता नोव्हेंबर महिन्यातच परदेशातील आंबे दाखल झालेत. आंबा शौकिनांसाठी ही एक पर्वणीच आहे. पण या आंब्याचा सिझन अवघे १५ दिवसच चालणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT