जिंतूर येथे एस बँकेसोबत करार 
महाराष्ट्र

Good News : उद्योग मित्र संस्था आणि एस बॅंक यांच्यात सामंजस्य करार

भारतातील खाजगी बँकांपैकी अग्रणी बँक एस बँक व उद्योग मित्र संस्था यामध्ये विविध योजना, विनातारण अर्थ सहाय्य, बॅंकेच्या विविध आर्थिक योजना,विविध प्रकारच्या शासकीय योजनांमधून अर्थसहाय्य, अडचणीत आलेल्या व आजारी असलेल्या उद्योगांना योग्य ते मार्गदर्शन व मदत इत्यादी संबंधी हा करार करण्यात आला.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

राजाभाऊ नगरकर

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : भारतातील खाजगी बॅंकांपैकी अग्रणी असलेली एस बॅंक आणि उद्योग मित्र संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात करण्यात आला. उद्योग मित्र संस्थेचे सभासद व उद्योजकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारा हा सामंजस्य करार मंगळवारी (ता. सहा) नाशिक येथे उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

भारतातील खाजगी बँकांपैकी अग्रणी बँक एस बँक व उद्योग मित्र संस्था यामध्ये विविध योजना, विनातारण अर्थ सहाय्य, बॅंकेच्या विविध आर्थिक योजना,विविध प्रकारच्या शासकीय योजनांमधून अर्थसहाय्य, अडचणीत आलेल्या व आजारी असलेल्या उद्योगांना योग्य ते मार्गदर्शन व मदत इत्यादी संबंधी हा करार करण्यात आला.

हेही वाचा - केंद्र सरकारच्या या खासगीकरणाच्या धोरणास विरोध करण्यासाठी परभणी येथील आरटीओ कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. सात) सकाळी काळ्याफिती लावून निदर्शने केली.

या कराराव्दारे एस बँकेच्या आणि उद्योग मित्र संस्थेच्यावतीने शिफारस करण्यात आलेल्या उद्योजकांच्या प्रकरणांवर प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. या करारामुळे राज्यभरातील स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यांना संस्थेच्या वतीने लाभ देण्यात येईल. अशी माहिती श्री. पेशकार यांनी दिली आहे. यावेळी एस बँकेचे एमएसएमई विभागाचे राज्य प्रमुख विवेक सन्मानवार, क्लस्टर हेड निलेश पवार तसेच नाशिक रिजनचे रिजनल मॅनेजर उपस्थित होते.

करारावर उद्योग मित्र संस्थेचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार व एस बँकेच्या वतीन विवेक सन्मानवार यांचे हस्ताक्षर आहे. याप्रसंगी विवेक सन्मानवार यांनी उद्योग मित्र संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या नॉलेज पार्टनर, डिजिटल फिटनेस ड्राईव्ह, एमएसएमई क्लीनिक इत्यादी उपक्रमाचे कौतुक केले. आजवर महाराष्ट्रातील सहाशे पेक्षा जास्त उद्योजकांनी याचा लाभ घेतला असून ही सतत संख्या वाढत आहे, असे राष्ट्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्यम बोर्डाचे सदस्य व उद्योग मित्र संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी सांगितले.

आगामी काळात महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक जिल्ह्यात उद्योग मित्राचे प्रतिनिधी हे सर्व उपक्रम घेऊन जातील व विविध उद्योग संघटनांच्या मदतीतून व स्वतंत्रपणे विविध उद्योगांना या योजनेचा लाभ देतील. सद्यस्थितीत नाशिक, औरंगाबाद, नांदेड, हिंगोली, जळगाव, अहमदनगर, ठाणे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, लातूर या जिल्ह्यात प्रतिनिधी कार्यरत झाले आहेत. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पावर आधारित विविध योजनांच्या मदतीने महाराष्ट्रात औद्योगिक विकास साधने, रोजगार उपलब्ध करून देणे आदी विषयात उद्योग मित्र संस्था अग्रेसर राहणार असून यासाठी एस बँकेने पुढाकार घेऊन हा करार केला आहे असे प्रदीप पेशकार यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

SCROLL FOR NEXT