Kashedi Ghat Latest News Today  Saam TV
महाराष्ट्र

Kashedi Tunnel: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी घाटातील प्रवास होणार सुसाट; सरकारचा मोठा निर्णय

Kashedi Ghat News: लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून लवकरच दुहेरी वाहतूक सुरु होणार आहे.

Satish Daud

Kashedi Ghat Latest News Today

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून लवकरच दुहेरी वाहतूक सुरु होणार आहे. १ मे रोजी याबाबतची सूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे कोकणवासियांची वाहतूक कोंडी फुटणार असून प्रवास सुसाट होणार आहे.

सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून कामानिमित्त शहरात राहणारे नागरिक मतदानासाठी आपआपल्या गावाकडे परतत आहेत. मुंबईतील चाकरमान्यांनी देखील कोकणाची वाट धरली आहे. निवडणूक काळामध्ये चाकरमान्यांच्या प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून भुयारी मार्गातून पुन्हा दुहेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.

कशेडी घाटात पुन्हा बोगद्यातून वाहतूक सुरू करण्याबाबतचे संकेत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिले आहेत. त्यामुळे कोकणवासियांना अवघ्या ५ ते ७ मिनिटात कशेडीचे घाट अंतर भोगद्यावाटे कापता येणार आहे. यामुळे चाकरमान्यांच्या वळणावळणाचा कशेडी घाटातील प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे.

दरम्यान, केवळ सणावारी आणि मतदानाच्या निमित्ताने या बोगद्यातून दुहेरी वाहतूक करण्याची मुभा देऊन कोकणवासीयांना प्रभावित करण्याचा केविलवाणा प्रयत्न महामार्ग बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून होतो, असा आक्षेप चाकरमानी घेत आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गातून कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. मात्र, मुंबईकडून कोकणात जाण्यासाठी वाहतुकीस परवानगी असूनही कशेडी घाटात बोगद्यातून जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आले नसल्याने मुंबईकरांना आजदेखील कशेडी टॅपमार्गे खेडकडे रवाना व्हावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT