Good news for farmers onion prices again at Rs 5 thousand per quintal Saam TV
महाराष्ट्र

Onion Price: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कांद्याच्या दरात पुन्हा वाढ; प्रतिक्विंटल मिळतोय 'इतका' भाव

Onion Price Latest News: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कांद्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

विश्वभूषण लिमये

Onion Price Latest News

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कांद्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा भाव पुन्हा एकदा प्रतिक्विंटल ५ हजार रुपयांच्या वर गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे कांद्याचा भाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील आठवड्यात दर घसरल्याने बाजारपेठेत कांद्याचा भाव प्रतिक्विंटल १ हजार रुपयांनी घसरला होता. त्यामुळे सोलापूर बाजारपेठेत शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी कांद्याची आवक घटली होती. शुक्रवारी जवळपास ५०० ट्रक आवक होती.

मात्र, सोमवारी बाजारपेठेत ४२९ ट्रक कांदा इतकाच कांदा आला होता. त्यामुळे घसरलेला दर पुन्हा ५ हजारांवर पोहोचला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यासह अहमदनगर,पुणे,सांगली जिल्ह्यातूनही कांद्याची आवक असते. याशिवाय कर्नाटकातील विजयपूर, गुलबर्गा, आळंद, बिदर या भागांतूनही मोठ्या प्रमाणात कांदा सोलापुरात येतो.

यंदा कांदा लागवडीनंतर महिनाभरात पाऊस न झाल्याने करपू गेला. त्याचा परिणाम दरावर आणि मागणीवर झाला आहे. मागील महिन्यात कांद्याचा दर साडेआठ हजारांच्या वर गेला होता. त्यामुळे दिवाळीमध्ये दहा हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळण्याची आशा व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत होती.

दरम्यान,दिवाळी सणात कांद्याचा वांदा होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर,सोलापूर बाजार समितीतील कांद्याचा दरही खाली आला. दिवाळीनंतर सोलापूर यार्डात आवक वाढली होती. आता पुढील काही दिवस दर पाच हजारांच्या आसपासच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT