Crop Insurance Saam tv
महाराष्ट्र

Crop Insurance: पीक विमा भरताना आधार कार्ड व सातबारा उतारा यावरील नावात थोडासा बदल असेल तरी विमा अर्ज स्वीकृत होतील

Bharat Jadhav

पिकांना सुरक्षा कवच म्हणून राज्य शासनाने फक्त एक रुपयात पीकविमा योजना आणली ही योजना मागील वर्षापासून सुरू करण्यात आली. यंदाही राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा दिला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी केलीय. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहनही कृषीमंत्र्यांनी केलं होतं. मात्र सोशल मीडियावर पीक विम्याबाबत आलेल्या एका मेसेजमुळे शेतकरी बुचकळ्यात पडलेत.

सातबारा आणि आधार कार्डमधील नावात थोडातरी बदल असला तरी शेतकरी बंधुंना पीकविमा योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत.व्हॉट्सअॅपवर पसरणाऱ्या मेसेजमुळे शेतकरी बुचकळ्याच पडलेत. यामुळे अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहत आहेत. परंतु सोशल मीडियावर व्हायरल झालेले मेसेज बनावट असून त्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. तसेच आधार कार्ड आणि साताबारामधील नावात बदल असला तरी या योजनेसाठी अर्ज करता येणार असल्याचं शासनाकडून सांगण्यात आले आहे. शासनाने याबाबतच परिपत्रक काढले आहे.

काय म्हटलंय परिपत्रकात

सातबारा आणि आधार कार्डमधील नावात किरकोळ जरी बदल असेल तरी विमा योजनेत सहभागी होता येणार नाही, अशा आशयाचा मेसेज व्हॉट्सअॅपद्वारे फिरत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. याबाबत वस्तुस्थिती अशी आहे की, आधार कार्ड व बँक खात्यात बहुतेक नावे सारखी असतात.परंतु ७/१२ वर कधी कधी नावात किरकोळ बदल असतो.असे असले तरी विमा अर्ज भरण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

.नावात थोडासा बदल असल्यास हरकत नाही परंतु पूर्णनाव, आडनाव वेगळे असल्यास चालणार नाही.नावात असलेला बदल विमा कंपनी मार्फत तपासला जाईल आणि तपासणी अंती अर्ज स्वीकृतीबाबत पुढील कार्यवाही केली जाईल.त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळून जावू नये.मात्र शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकाचा आणि लागवड असलेल्या क्षेत्राचाच विमा घ्यावा.विमा घेतलेले पीक प्रत्यक्षात शेतात आढळले नाही तर विमा अर्ज नामंजूर होईल.शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत पूर्ण करावी.दिनांक २ जुलै २०२४ पर्यंत सुमारे ५७ लाख विमा अर्ज प्राप्त झालेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati News : अमरावतीत मध्यरात्री मोठा तणाव, संतप्त जमावाने पोलीस स्टेशन फोडलं; दगडफेकीत २९ पोलीस जखमी

Rain Alert : आजपासून या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट

Horoscope Today : नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल, जोडीदाराची भेट होईल, आज तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

SCROLL FOR NEXT