अवकाळी पाऊस, दुष्काळ या अस्मानी संकटामुळे पिचलेल्या शेतक-यांची पिक विम्याच्या नावाखाली मोठी लूट सुरू आहे. साम टीव्हीनं स्टिंग ऑपरेशनमधून नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना लुटीचा गोरखधंदा कसा सुरू आहे हे समोर आणलं. एक रुपयात पीकविम्याच्या अर्जासाठी शेतकऱ्यांकडून 100 रुपये वसुल करणाऱ्या CSC चालकांची नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मात्र अप्रत्यक्षपणे पाठराखण केलीय.
CSC चालक १०० रुपये घेतो मात्र शेतकऱ्यांचे २-५ हजार रुपये वाचतात असं भुसे म्हणालेत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलंय. त्यामुळे खुद्द पालकमंत्री शेतकऱ्यांच्या लुटीचं समर्थन करतात का? अस सवाल उपस्थित केला जातोय.
यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. 'कमिशनखोर सरकार' असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केलीय तर 'CSCचालकांचं समर्थन संतापजनक असल्याचं शेतकरी नेते अजित नवले यांनी म्हटलंय.
राज्यात मोठा गाजावाजा करून 1 रुपयात पीक विमा योजना राज्य सरकारनं सुरू केली. सत्ताधारी या योजनेचा दाखला देतात. मात्र पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून 100 रुपये लूट केल्याचा साम टीव्हीनं स्टिंग ऑपरेशनमध्ये पर्दाफाश केला होता. मात्र तरीही मंत्रिमहोदयच बेकायदा पैसे घेणा-या CSCचालकांचं समर्थन करतायेत. हे संतापजनक आहे. कुंपणच शेत खात असेल तर सामान्यांनी कोणाकडे पहायचं असा सवाल ग्रामीण भागातून विचारला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.