Electricity Bill Reuduction saam tv
महाराष्ट्र

Electricity Bill: वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; वीज दरात होणार मोठी कपात

Electricity Bill Reuduction: वीज दरात मोठी कपात होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

Bharat Jadhav

वीज ग्राहकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाची बातमी आहे. वीजदरात कपात करण्यात येणार असून लवकरच वीज ग्राहकांना स्वस्त वीज मिळणार आहे. पहिल्या वर्षी १० टक्के आणि टप्प्याटप्प्यानं पुढील पाच वर्षांमध्ये वीज दरामध्ये तब्बल २६ टक्के कपात करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत दिलीय.

‘राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी १० टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत ५ वर्षांत २६ टक्के वीजदर कमी होणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

पूर्वीचा काळ पाहिला तर १० टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिलाय. अशा आशयाची पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.

दरम्यान याचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे. राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍यांचे प्रमाण हे ७० टक्के आहे. त्यांच्यासाठी १० टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला.असेही फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : सकाळी नाश्ता करणे गरजेचे आहे की नाही? संशोधनातून समोर आली नवीन माहिती

Rohit Sharma-Virat Kohli : 'रो-को'ला ब्रेक! रोहित शर्मा, विराट कोहलीचं कमबॅक लांबणीवर, मोठी अपडेट आली

Shivani Surve: मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वेचं वय किती?

Satara Doctor Case: सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई, PSI गोपाल बदने पोलिस खात्यातून बडतर्फ

Haldi Rituals: लग्नाच्या आधी हळदीचा विधी का करावा, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT