Nashik-Mumbai Railway Saam Tv
महाराष्ट्र

Nashik-Mumbai Railway: गुड न्यूज! नाशिक-मुंबई रेल्वे प्रवास होणार सुसाट; नवीन रेल्वे लाईन होणार सुरू, प्रवासाचा वेळ १ तासाने वाचणार

Indian Railway News: नाशिक -मुंबई रेल्वेमार्गावर समांतर रेल्वे लाईन टाकली जाणार आहे. कसारा घाट ते मनमाड दरम्यान नवीन रेल्वे लाईन उभारली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकर आणि नाशिककरांचा प्रवास सुसाट होणार आहे.

Priya More

अभिजित सोनावणे, नाशिक

नाशिकवरून मुंबईसाठी आणि मुंबईवरून नाशिकसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठ आनंदाची बातमी आहे. कारण नाशिक ते मुंबई रेल्वे प्रवास आणखी जलद होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ तब्बल एका तासाने वाचणार आहे. नाशिक- मुंबई रेल्वे मार्गावर नवीन रेल्वे लाईन उभारण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक -मुंबई रेल्वेमार्गावर समांतर रेल्वे लाईन टाकली जाणार आहे. कसारा घाट ते मनमाड दरम्यान नवीन रेल्वे लाईन उभारली जाणार आहे. साधारणपणे १४० किलोमीटरच्या मार्गावर समांतर रेल्वे लाईन टाकली जाणार आहे. नवीन रेल्वेमार्गावर नवीन नाशिकरोड, नवीन पाडळी, वैतरणानगर, चिंचलखैरे ही चार नवीन स्थानके बांधली जाणार आहेत.

नाशिक-मुंबई नव्या रेल्वे लाईनवर १२ बोगदे असणार आहेत. कसारा घाटातील चढ कमी होणार असल्याने इंधनाची देखील बचत होणार आहे. त्याचसोबत विना बँकर इंजिन रेल्वे धावणार असल्यानं प्रवासाचा वेळ वाचणार आहे. महत्वाचे म्हणजे या प्रवासादरम्यान प्रवासाचा वेळ तब्बल १ तासांनी वाचणार आहे. या नव्या मार्गासाठी चार हजार कोटींचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT