विसर्जन मिरवणूक 
महाराष्ट्र

विसर्जन मिरवणूक काढणे भोवले..मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

विसर्जन मिरवणूक काढणे भोवले..मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

अभिजीत घोरमारे

गोंदिया : कोविड-१९ चा धोका अद्याप टळलेला नसल्याने शासनाने कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढण्यास बंदी घातली होती. असे असताना देखील मुंडीकोटा येथे मोठ्या वाहनावर डीजे सिस्टम लावून नाचत गणपती विसर्जन मिरवणूक काढली होती. मिरवणूक काढणाऱ्या मंडळाचे कार्यकर्ते, डीजे धुमाल पार्टी व वाहन चालक- मालकाविरुद्ध गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (gondiya-news-ganesh-visrajn-Immersion-procession-surrounded-Crime-against-the-activists-of-the-ganesh-Mandal)

महाराष्ट्र शासन गृह विभाग मंत्रालय मुबंई यांच्या परिपत्रकानुसार कोविड-१९ मुळे उद्‌भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, यंदा देखील गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिवाय विसर्जन मिरवणूकीला देखील बंदी होती. मात्र याचे उल्‍लंघन करत मुंडिकोटा येथील नवयुवक गणेश मंडळ मुंडीकोटा यांनी गणपती विसर्जन मिरवणूक काढली.

विसर्जन मिरवणूकही काढली

बंदी असतानाही सरस्वती दिलवर ग्रुप डीजे धमाल यांची धुमाल व साउंड मोठ्या गाडीवर लावून गणपतीचे गाणे वाजविण्यात आले. शिवाय बँड वाजवून मोहल्ल्यातील पुरुष व महिला नाचत, एकमेकांना गुलाल लावीत गणपती विसर्जन मिरवणूक काढली. यामुळे पोलिसांनी सदर प्रकरणी गुन्‍हा दाखल केला आहे.

यांच्‍यावर केला गुन्‍हा दाखल

पोलिसांनी स्वतः दाखल केलेल्या तक्रारीवरून मंडळाचे अध्यक्ष प्रमोद काळसर्पे, उपाध्यक्ष सोमेश राऊत, सचिव शिवकुमार राऊत, कोषाध्यक्ष बुद्धघोष बोम्बार्डे, सदस्य मंगेश राऊत, सदस्य निकेश नीलगाये, सदस्य अक्षय राऊत, मा सरस्वती दिलवर ग्रुप डीजे धुमाल पार्टी पांजरा (मालक-देवाडा, तुमसर, जिल्हा भंडारा) व गाडी (क्रमांक एमएच ३६, एए १३२४) मालक- चालक विरुद्ध तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास तिरोडा पोलिस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT