रोमीओचा मुलीच्या घरासमोर धिंगाणा; जबरदस्‍ती लग्नासाठी पिस्तुलचा धाक

रोमीओचा मुलीच्या घरासमोर धिंगाणा; जबरदस्‍ती लग्नासाठी पिस्तुलचा धाक
रोमीओचा मुलीच्या घरासमोर धिंगाणा; जबरदस्‍ती लग्नासाठी पिस्तुलचा धाक
Published On

जळगाव : भुसावळ शहरातील खडका रोड भागातील तरुणीशी जबरजस्तीने लग्न लावून देण्यासाठी मुलीच्या घरासमोर पिस्तुल आणि चाकूच्या धाकावर दहशत घालण्याचा प्रकार रविवारी (ता. २०) रात्री साडे अकराच्या सुमारास घडला. याबाबत दोघांविरुध्द बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील खडका रोड भागातील पटेल कॉलनीतील रहिवासी आरीफ भाईसाहब पटेल (वय ४९) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी आशिक असलम बेग उर्फ बाबा काल्या (रा. अयान कॉलनी) व त्याचा साथीदार (नाव माहित नाही) यांनी १९ सप्‍टेंबरला रात्री साडे अकराच्या सुमारास पटेल कॉलनीत पटेल यांच्या घरासमोर त्यांच्या मुलीसोबत लग्न करण्याच्या हेतूने, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बाबा काल्यासोबत असलेल्या त्याच्या साथीदाराने घरातील लोखंडी दरवाजावर फर्शीचे तुकडे फेकून दरवाजाचा कडीकोयंडा तोडला. तर बाबा काल्याने हातात पिस्टल घेऊन तर त्याच्या साथीदाराने हातात चाकू घेऊन मोठमोठ्याने आरडाओरड केली.

रोमीओचा मुलीच्या घरासमोर धिंगाणा; जबरदस्‍ती लग्नासाठी पिस्तुलचा धाक
अनोखी ऑक्सिजन बँक..२१ एकरात दीड हजार वटवृक्षांची लागवड

सबको गोली मार दुंगा

तसेच बाबा काल्याने 'मै सबको गोली मार दुंगा बाहर निकलो' अशी धमकी देऊन शिवीगाळ करुन गल्लीत दहशत निर्माण केली. याबाबत घटनेची माहिती मिळताच डिवायएसपी सोमनाथ वाकचौरे, बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. तसेच मुलीच्या वडिलांना धीर दिला. बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश गोंटला हे तपास करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com