Gondia Politics Breaking News:  Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: गोंदियामध्ये भाजपला धक्का! माजी आमदाराने ठोकला पक्षाला रामराम; नाना पटोलेंची घेतली होती भेट

Gangappa Pujari

शुभम देशमुख, गोंदिया|ता. २१ जून २०२४

गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गोंदिया विधानसभेवर शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले व सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गोंदिया विधानसभेवर शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले व सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

"माझ्या समर्थकांकडून मला भाजपपासून दुर होण्याचा आग्रह केला जात आहे. त्यामुळे मी भाजप पासून दुर होत आहे." असे राजीनामा पत्र रमेश कुथे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविला आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आठवड्या भरापूर्वीच मध्यरात्रीच्या सुमारास रमेश कुथे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. अखेर रमेश कुथे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मात्र त्यांनी पक्षप्रवेशा संदर्भात अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : भारताचे संविधान म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार: राहुल गांधी

Harbhajan Singh: 'हे चूकीचं आहे..', हार्दिक पंड्याला कॅप्टनीवरुन काढल्यामुळे हरभजन सिंग भडकला

Maval News: 'प्रत्येकजण मरायला आलाय..' सुनिल शेळके विरोधकांवर संतापले, अजित पवारांनी कान टोचले; मावळात हायहोल्टेज ड्रामा!

Amitabh Bachchan : दिवसाला २०० सिगारेट ओढायचे 'बिग बी'; मुंबईत येताच सुटलं व्यसन, कसं? स्वतःच केला खुलासा

Arbaz- Nikki: बाईsss काय हा प्रकार!, अरबाजने निक्कीला चक्क उचलून घेतलं

SCROLL FOR NEXT