शुभम देशमुख, प्रतिनिधी...
MBBS Student Write Letter To Raj Thackeray: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राज्यातील या सत्तानाट्यावर (Maharashtra Political Crisis) सामान्य जनतेमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे चित्र दिसत आहे. सत्तेच्या या सारीपाटात शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करताना कुठलाही पुढारी दिसत नाही.
राज्याच्या याच राजकारणाला कंंटाळून गोंदियात एम.बी.बी.एसच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे याना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहले आहे. विशाल ढेबे असे या तरुणाचे नाव असून तो जालना जिल्याच्या अंबड तालुक्याच्या वडीकाळ्या गावातील रहिवासी आहे. या पत्रामध्ये त्याने महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा सांभाळावी अशी खास राज ठाकरेंना केली आहे.
काय आहे पत्र...
सध्या महाराष्ट्रामध्ये शिंदे -फडणवीस (Shinde- Fadanvis Sarkar) सरकार सोबत अजित पवार गटाने हात मिळवणी केली. त्यामुळे राजकारणात चालले तरी काय असा प्रश्न तरुणांसमोर उभा असून महाराष्ट्रामध्ये अराजकता वाढली आहे. राजकारणी ज्वलंत प्रश्नांकडे कानाडोळा करून स्वतःच्या हितासाठी राजकारण करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. एकीकडे समृद्धी महामार्गावर अपघात होऊन २५ लोकांचा जळून मृत्यू होतो; तर दुसरीकडे आपले लोकप्रतिनिधी हे मंत्री पदाची शपथ घेतात.
महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे प्रश्न असून आज महाराष्ट्रमध्ये महिला सुरक्षित नाही,शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करीत आहेत. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न प्रलंबित असून सुद्धा शासन आपल्या दरबारी या योजनेतून सरकार लोकांपर्यंत योजना नेण्याच्या प्रयत्न करते पण त्यांचे प्रश्न काय आहेत हे सोडविण्याचा प्रयत्न करीत नाही.
राज ठाकरेंना केली खास विनंती...
यामुळेच या युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना विनंती केली आहे . की आपण या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी या महाराष्ट्राची धुरा आपण आपल्या खांद्यावर घ्यावी आणि महाराष्ट्राला एक वैभव लाभाव या साठी फक्त राज ठाकरेचे पर्याय उरले असल्याचे सांगत विशालने स्वतःच्या रक्तांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.