Mother-Daughter Died Due To Manyar Snake Bite Saam Tv
महाराष्ट्र

Gondia News: आई-लेकीसाठी ती काळरात्र ठरली! गाढ झोपेत असतानाच अनर्थ घडलं, दोघींचा मृत्यू

Mother-Daughter Died Due To Manyar Snake Bite: झोपेत असताना मन्यार साप चावल्यामुळे मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गोंदियामध्ये घडली आहे.

Priya More

शुभम देशमुख, गोंदिया

मण्यार साप चावल्यामुळे मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील गुजूरबोडगा येथे ही घटना घडली आहे. घरामध्ये झोपले असता दोघींनाही साप चावला. त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले पण उपचारापूर्वी दोघींचाही मृत्यू झाला. या घनटेमुळे अकोल्यामध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या गुजूरबोडगा गावामध्ये ही घटना घडली आहे. या गावामध्ये राहणारे उसेंडी कुटुंब रात्री झोपले होते. घरामध्ये आलेल्या मण्यार सापाने ७ वर्षांची मुलगी आणि तिच्या आईला चावा घेतला. काहीतरी चावल्याचे लक्षात येताच त्यांनी उठून पाहिले तर त्यांना धक्का बसला. घरामध्ये मण्यार साप आढळून आला.

साप चावल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ गावातील नागरिकांना बोलावून घेतले. गावकऱ्यांनी मण्यार सापाला मारले. त्यानंतर त्यांनी दोघींनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी मुलीला मृत घोषीत केले. तर तिच्या आईची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला उपचारासाठी गोंदिया येथिल जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. पण रुग्णालयामध्ये पोहचण्यापूर्वीच तिचा देखील मृत्यू झाला. या घटनेमुळे उसेंडी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मावळमध्ये एसटी बस आणि खासगी बसचा अपघात, 11 प्रवासी जखमी

Mumbai Metro: ठाणे ते गेट वे ऑफ इंडिया; आणखी एका मेट्रोचा प्रस्ताव, 13 ठिकाणी असणार स्टॉप

Save Electricity : AC सोबत फॅन लावावा का? वाचा वीज वाचवण्याच्या टिप्स

Pune News: पुण्यामध्ये पोलिस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू, फुरसुंगी रेल्वे क्रॉसिंगजवळ ट्रेनने दिली धडक

Political Explainer : ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंचाही भीमशक्ती-शिवशक्तीचा प्रयोग; कुणाची ताकद वाढणार?

SCROLL FOR NEXT